अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच१ बी व्हिसा धारकांवर शुल्कात मोठी वाढ केलीय. यापूर्वी १० हजार डॉलर्समध्ये एच१ बी व्हिसा मिळायचा पण त्यासाठी आता १ लाख डॉलर म्हणजेच ८८ लाख रुपये मोजावे लागणार आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर सध्याच्या व्हिसाधारकांसह नव्याने व्हिसा घेण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान, व्हाइट हाऊस प्रेस सचिव कॅरोलीन लेविट यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. ८८ लाख रुपये दरवर्षी द्यावे लागणार नाहीत. ही वन टाइम फी असून फक्त नव्या व्हिसा धारकांनाच लागू असेल असं स्पष्ट करण्यात आलंय.
युएस सिटिजनशिप अँड इमिग्रेशन सर्विसेसने स्पष्ट केलं की नवे नियम फक्त नव्या व्हिसा धारकांसाठी आहेत. आतापर्यंत आलेल्या अर्जांसाठी ते लागू नाहीत. आधीपासून एच१ बी व्हिसा असलेल्या किंवा सध्या परदेशात असलेल्यांना व्हिसा रिन्यू करतेवेळी हे शुल्क लागणार नाही.
Premium| Trump Immigration Policy : 24 तासात अमेरिकेत परत या, बड्या कंपन्यांनी H1 B visa धारकांना असा ईमेल का पाठवलाय?लेविट यांनी सांगितलं की, सध्या ज्यांच्याकडे एच१ बी व्हिसा आहे आणि जे परदेशात आहेत त्यांना ८८ लाख भरावे लागणार नाहीत. सध्याचे एच१ बी व्हिसा धारक नेहमीप्रमाणे अमेरिकेत ये-जा करू शकतात. नवा आदेश फक्त नवे अर्ज आणि आगामी लॉटरी सायकलवर लागू असेल.
अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सांगितलं की, जे लोक अमेरिकेतून भारतात निघालेत किंवा भारतातून अमेरिकेत येणार आहेत त्यांनी घाई करण्याची गरज नाही. तसंच ८८ लाख रुपये फी देण्याची आवश्यकता नाही. हे फक्त नव्या व्हिसा धारकांसाठी आहे.
दरम्यान, अमेरिकेतील भारतीय दुतावासाने आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. +1-2020-550-9931 या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉटसअप मेसेज करता येईल. हा नंबर फक्त भारतीय नागरिकांच्या इमर्जन्सीसाठी असल्याचं दुतावासाने सांगितलं.