Airport Bomb: धक्कादायक! डब्लिन विमानतळ बॉम्ब आढळला, टर्मिनल २ रिकामे केले, घटनेने खळबळ
esakal September 22, 2025 08:45 AM

सुरक्षेच्या कारणास्तव आयर्लंडमधील डब्लिन विमानतळ तात्काळ रिकामे करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी (२० सप्टेंबर २०२५) टर्मिनल २ रिकामे करण्यात आले. सुरक्षेच्या धोक्याचे नेमके कारण अधिकाऱ्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. सुरुवातीच्या अहवालांनुसार विमानतळावर संशयास्पद पॅकेज किंवा बॉम्ब आढळल्याच्या वृत्तामुळे हे स्थलांतर करण्यात आले आहे.

टर्मिनल १ वर पाठवण्यात आले. जिथे बरेच जण बराच काळ हॉलमध्ये वाट पाहत होते. विमानतळावरून माहिती नसल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. या घटनेच्या काही तासांपूर्वीच, अनेक प्रमुख युरोपीय विमानतळांवर सायबर हल्ल्यांचा परिणाम झाला. लंडन हीथ्रो, ब्रुसेल्स आणि बर्लिन विमानतळांवर उड्डाणे रद्द करण्यात आली आणि त्यांना मोठा विलंब झाला.

H-1B, H-4 visas: ८८ लाख वाचवायचे आहेत? रविवारच्या आत अमेरिकेला परत या! मायक्रोसॉफ्ट आणि इतर कंपन्या करत आहेत हे आवाहन

या सायबर हल्ल्याने हे दाखवून दिले की आधुनिक विमानतळ प्रणाली डिजिटल तंत्रज्ञानावर किती अवलंबून आहेत. ज्यामुळे चेक-इन, सुरक्षा आणि सामान वाहतूकऑपरेशन्सवर परिणाम होतो. डब्लिन विमानतळाने प्रवाशांना खात्री दिली आहे की त्यांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. अधिकारी सर्व उड्डाणे आणि प्रवाशांची पुनर्रचना करण्यासाठी काम करत आहेत. काही विलंब आणि ऑपरेशनल व्यत्यय सध्या सुरू आहेत.

Cyber Attack on European Airports : मोठी बातमी! युरोपमधील अनेक देशांच्या विमानतळांवर सायबर हल्ला

प्रवाशांना अपडेटसाठी एअरलाइनशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ऑनलाइन फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये टर्मिनलच्या बाहेर मोठी गर्दी वाट पाहत असल्याचे दिसून येते, तर सुरक्षा रक्षक आणि विमानतळ पोलिसांची वाहने घटनास्थळी पोहोचतात. टर्मिनल २ हे एअर लिंगस, अमेरिकन एअरलाइन्स, डेल्टा, एमिरेट्स आणि युनायटेड एअरलाइन्स सारख्या एअरलाइन्सचे घर आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.