प्रसिद्ध लॅपटॉप कंपनी एसरने भारतात त्यांचा एक खास डिव्हाइस एसर कनेक्ट M4 5G मोबाइल हॉटस्पॉट भारतात लाँच केला आहे. तर तुम्ही हे डिव्हाइस पाहिले तर ते एखाद्या कॉम्पॅक्ट स्मार्टफोनसारखे वाटेल, परंतू तसे नाही. तुम्ही हे पॉकेट राउटर म्हणून कोठेही सहज घेऊन जाऊ शकता. हे मोबाईल हॉटस्पॉट डिव्हाइस जलद कनेक्टिव्हिटी आणि पोर्टेबिलिटी देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. यात 5G स्पीड, वाय-फाय 6 ड्युअल-बँड सपोर्ट आणि ट्राय-सिम फ्लेक्सिबिलिटी देण्यात आली आहे, ज्यामुळे हे डिव्हाइस वापरण सध्याच्या या मॉर्डन यूजर्ससाठी फायदेशीर ठरेल. तसेच ज्यांना प्रवासात इंटरनेटची आवश्यकता आहे ते देखील यांचा वापर अगदी सहजरित्या करू शकतात.
एसर कनेक्ट एम४ ची किंमत आणि उपलब्धताएसर कनेक्ट एम4 ची किंमत 19,999 रुपये आहे आणि हे डिव्हाइस अमेझॉन आणि एसर ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध आहे.
एसर कनेक्ट एम4 ची फिचर्सएसर कनेक्ट एम4 एकाच वेळी 16 डिव्हाइसला कनेक्ट होऊ शकते. या पॉकेट राउटर मध्ये ट्राय-सिम सेटअप नॅनो सिम, ईसिम आणि व्ही सिमला घालता येते. याद्वारे अतिशय जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह इतर देखील डिव्हाइस कनेक्ट करता येते. तसेच असा दावा केला जातो की, 135 हून अधिक देशांमध्ये हा हॉटस्पॉट वापरला जाऊ शकतो. हे डिव्हाइस SIMO SignalScan तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे सर्वात मजबूत नेटवर्क डिटेक्ट करून त्यावर स्विच करते.
हे डिव्हाइस धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 मजबूत रेटिंगसह येते. त्याची कॉम्पॅक्ट आणि डिझाइन (300 ग्रॅमपेक्षा कमी) ते सहजरित्या कोठेही घेऊन जाता येईल. तर 2.4-इंच टचस्क्रीन डिस्प्लेमुळे वापरण्यास सोपे होते. 140 × 86 × 19 मिमी मोजणारे, ते ट्रॅव्हल बॅग, वर्कस्टेशन किंवा अगदी खिशातही आरामात बसते.
याला 8000 एमएएच बॅटरीचा आधार आहे जो 28 तासांपर्यंत सतत वापरण्याची सुविधा देतो आणि यूएसबी-सी फास्ट चार्जिंग पोर्टद्वारे पॉवर बँक म्हणून देखील काम करतो.
एसर कनेक्ट एम4 मध्ये मीडियाटेक ऑक्टा-कोर प्रोसेसर, 3 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. सुरक्षा फिचर्समध्ये WPA3 एन्क्रिप्शन, फायरवॉल प्रोटेक्शन, सिम लॉक फीचर, बिल्ट-इन व्हीपीएन सपोर्ट आणि ऑटोमॅटिक अपडेट्स यांचा समावेश आहे.