चिपळुणात नवरात्रोत्सवानिमित्त
नवदुर्गा सुयश ठेव योजना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सर्वसामान्यांना बचतीची सवय लागावी यासाठी विविध ठेव योजना लागू केल्या आहेत. त्यात नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा सुयश ठेव योजनेचा समावेश आहे.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पतसंस्थेने विशेष उद्दिष्ट ठेवून वाढदिवसापूर्वी जाहीर केलेल्या मासिक ठेव योजनेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता नवरात्रोत्सवनिमित्त नवदुर्गा सुयश ठेव योजना घटनस्थापनेच्या दिवशी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी १५ दिवसांचा असून, ठेवीला ९ टक्के व्याजदर ठेवण्यात आला असून, सर्वसामान्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी केले आहे.
चिपळूण पतसंस्थेने सभासदांना बचतीची सवय लागावी यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. विविध प्रकारच्या आवर्त व धनलक्ष्मी ठेव योजनेच्या माध्यमातून ६ कोटी २५ लाखांच्या ठेवी केल्या आहेत. हे खातेदार १०० रुपयांपासून गुंतवणूक करत आहेत तसेच महिलांसाठी सुकन्या ठेव, गृहलक्ष्मी ठेव योजना तसेच सक्षम महिला सक्षम कुटुंब कर्ज योजना संस्थेच्या माध्यमातून कार्यान्वित आहेत.