वडगाव मावळ, ता. २२ : नवरात्रीनिमित्त कान्हे (आंबेवाडी) येथील श्री मोरया मित्र मंडळाने येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक नवरात्रोत्सव आयोजित केला असून, त्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक मदन शेडगे यांनी दिली. या नवरात्रोत्सवात मंगळवारी (ता. २३) रात्री महिलांसाठी होम मिनिस्टर हा स्पर्धात्मक कार्यक्रम, बुधवारी महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुवारी हिप्नोटीझम, शुक्रवारी शैलेश लोखंडे प्रस्तुत बारा गावच्या बारा अप्सरा, शनिवारी ग्रुप दांडिया, रविवारी हळदी कुंकू व दांडिया, सोमवारी भजन, मंगळवारी बाळासाहेब महाराज शिंदे यांचे प्रवचन, बुधवारी बूगी बूगी डान्स स्पर्धा व गुरुवारी दांडिया व रावण दहन कार्यक्रम होईल. खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, गायक कल्याण गायकवाड उपस्थित राहणार आहेत. पंचक्रोशीतील नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.