'भेटशी तू पुन्हा', 'दगडी चाळ', 'जंगली' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत हिने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. तिने स्वतःच्या हिमतीवर सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. तिच्या सौंदर्याचे आणि डान्सचेदेखील लाखो चाहते आहेत. पूजा मूळची मालवणची आहे. मात्र आता पूजाने नॉनव्हेज सोडलंय. त्यामुळे आश्चर्य वाटल्याने अनेक चाहते तिला यामागचं कारण विचारताना दिसतायत. एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलंय.
पूजा कोकणातली आहे. आणि कोकण म्हंटल की समृद्ध समुद्रकिनारा आला. तिथे मासे मोठ्या प्रमाणात मिळतात. मात्र आता कोकणातली असूनही पूजाने नॉनव्हेज खाणं बंद केलंय. याबद्दल बोलताना राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, 'मी कट्टर नॉन व्हेजिटेरियन होते. जंगली सिनेमा शूट करेपर्यंत मी नॉनव्हेज खायचे. पण आता मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. यामागचं कारण सांगताना पूजा म्हणाली की, मला प्राण्यांसाठी खूप काही करायचं आहे. माझ्या मनात गेली बरीच वर्ष एक प्रकारचं गिल्ट होतं की एकीकडे मी प्राण्यांना वाचवते आणि दुसरीकडे मीच त्यांना मारून खाते. त्यामुळे मी त्यांना मारून खाऊ शकत नाही. मला त्यांना मारण्याचा हक्कही नाही.'
View this post on InstagramA post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)
ती पुढे म्हणाली, 'बरीच वर्षे ही सल माझ्या मनात होती पण लहानपणापासून मासे खाल्ल्यामुळे मला ते नीट सोडता ही येत नव्हते. त्यामुळे अचानक नॉनव्हेज सोडणं माझ्यासाठी थोडं त्रासदायक होतं. मी मान्य करते, की मी काही वर्ष नॉनव्हेज खाल्लं पण माझ्या मते ती गोष्ट समजून येणे सुद्धा महत्त्वाची आहे. कारण आपण इतक्या सार्या गोष्टी निसर्गाकडून घेतले आहेत. आणि आता हीच ती वेळ आहे की आपण निसर्गाला त्या परत केल्या पाहिजेत. लोक म्हणतात की तू एकट्याने नॉनव्हेज बंद करून काय होणार? पण माझ्यामध्ये कुठेतरी आपण स्वतः पासून सुरुवात केली पाहिजे. तेच मी केलं.'
पूजा म्हणाली, 'जंगली सिनेमाच्या शूट नंतर मी हत्तींसोबत राहून आले. खूपच जवळ गेले निसर्गाच्या , तिथेच मला जाणवलं की मोठी गाडी, घर, एसी या गोष्टी काहीच नाही आहेत. आपण जेथे राहतोय त्याच गोष्टी हळूहळू जर आपल्या हातातून निसटून गेल्या तर काही फायदा नाही. मी जेव्हा व्हेजिटेरियन झाले तेव्हा मला समजलं की व्हेज मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत खाण्यासारख्या.' पूजा सध्या पतीसोबत ऑस्ट्रेलियात असते. मात्र तिने अभिनयातील करिअर सोडलेलं नाही.
अक्षय केळकरच्या 'काजळमाया' मध्ये चेटकीण म्हणून दिसणार 'ही' अभिनेत्री; ठरणार स्टार प्रवाहचा नवा चेहरा