MNS Raj Thackeray : हे हिंदी हवं कशाला? स्टेशनच्या नावावरून राज ठाकरे भडकले, नेमकं काय घडलं ?
Saam TV September 23, 2025 10:45 PM
  • राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर शहाड स्थानकावरील हिंदी शब्द हटवण्यात आला.

  • मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ कृती करत स्टेशनच्या नावाचा फलक बदलला.

  • रेल्वे प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला गेला होता.

  • मराठी पाट्यांच्या प्रश्नावर मनसेची ठाम भूमिका पुन्हा अधोरेखित झाली.

राज्यात हिंदी मराठी भाषिक वाद उफाळलेला असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ दौऱ्यावर असताना केलेली कृती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मराठी पाट्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याने या आधीच अनेक दुकानांवर पुन्हा मराठी नावे दिसू लागली आहेत. राज ठाकरे यांनी दिलेला आदेश त्यांचे कार्यकर्ते कधी मोडीत काढत नाहीत हे अनेकदा दिसून आलं. मराठी भाषेच्या जतनासाठी त्यांनी प्रत्येकवेळी ठोस पाऊल उचलली आहेत. याचाच अनुभव शुक्रवारी पुन्हा एकदा आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण आणि अंबरनाथ दौऱ्यावर होते. अंबरनाथहुन कल्याणच्या दिशेने येत असताना शहाड रेल्वे स्टेशन समोर मनसेचे काही पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. राज ठाकरे यांची गाडी शहाड रेल्वे स्टेशन समोर थांबली असता मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या दरम्यान राज ठाकरे गाडीतून उतरताच त्यांचं लक्ष समोर असलेल्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या फलकावर गेलं.

Raj Thackeray : निवडणुकीत गाफील राहू नका, कारण...; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना महत्वाचा आदेश

ज्या ठिकाणी स्टेशनचे नाव मराठीत शहाड आणि हिंदीत सहद असा लिहिलं होतं. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विचारले, "हा काय प्रकार आहे?" त्यावर कार्यकर्त्यांनी सांगितलं, "स्टेशनचं नाव मराठीत 'शहाड' लिहिलेल आहे आणि हिंदीमध्ये 'सहद' लिहलेलं आहे." कार्यकर्त्यांच्या या उत्तरावर राज ठाकरे म्हणाले, "हिंदी मध्ये पाहिजे कशाला?"

Raj Thackeray : राज ठाकरे आज अंबरनाथ -कल्याण दौऱ्यावर, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार | VIDEO

राज ठाकरेंची ही सूचना मनसेपदाधिकाऱ्यांना लगेच लक्षात आली. हिंदी सहद काढून टाकू असा शब्द पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना दिला आणि राज ठाकरे गाडीतून बसून रवाना झाले. त्यानंतर मनसे पदाधिकारी बंडू देशमुख यांनी शहाड रेल्वे स्थानकात जाऊन प्रबंधकला हिंदी मध्ये लिहिलेला शब्द दोन दिवसांत काढून टाकायचा अल्टीमेटम दिला. अखेर राज ठाकरे यांच्या आदेशानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने स्टेशनचे नाव हिंदी शब्द 'सहद' हा काढून मराठीत 'शहाड' शब्द लिहिला आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृतीचं कौतुक होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.