अंबाबाई मंदिरात पूर्वी ८४ कंदील, दोन कंदीलांचा गाभारा व तीन मशालींच्या उजेडात पालखी सोहळा होत असे; रोषणाई व चुना लावण्याची जबाबदारी चंद्र सखाराम सावंत या रोषणाईकाराकडे होती.
उदयसिंह राजेयादव यांनी ‘करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मोडी कागदपत्रे’ या खंड-२ मधून १७००–१८९६ दरम्यानच्या अंबाबाई मंदिरातील व्यवस्थेची माहिती मोडी लिपीतून उलगडली.
१९७० च्या दशकापासून विजेची व्यवस्था झाली असून आज हायमास्ट, एलईडी बल्ब, रंगीत एलईडी यामुळे मंदिर उजळते; मात्र पालखी सोहळ्यात मशालींचा वापर अजूनही कायम आहे.
Ambabai Mandir Kolhapur : नंदिनी नरेवाडी :अंबाबाई मंदिर कंदिलाच्या दिव्यांनी उजळून निघायचे. त्यासाठी ८४ कंदिलांचा प्रकाश मंदिर परिसरात पडत होता. गाभाऱ्यातही दोन कंदिलांच्या उजेडात मूर्तीचे दर्शन होत होते. या कंदिलांत तेल घालण्याची जबाबदारी चंद्र सखाराम सावंत या रोषणाईकारावर होती. त्याच्याकडे नवरात्रोत्सवात मंदिराला रंगविण्यासाठी चुना लावण्याची जबाबदारीही होती. अंबाबाई मंदिरात कशा पद्धतीची व्यवस्था होती आणि प्रधान कशा पद्धतीने या सर्वांवर देखरेख ठेवत होते, याची माहिती मोडी लिपीच्या अभ्यासातून पुढे आली.
उदयसिंह राजेयादव लिखित करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मोडी कागदपत्रे (खंड - २) याच्या माध्यमातून यावर प्रकाश टाकला आहे. अंबाबाई मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व मोडी लिपीत आहे. ही लिपी अनेकांना समजत नसल्याने कागदपत्रांचे मराठीत भाषांतर करून त्याचे खंड प्रकाशित करण्याचे काम राजेयादव यांनी केले आहे. या दुसऱ्या खंडामध्ये त्यांनी १७०० ते १८९६ या कालखंडातील अंबाबाई मंदिरातील मोडी लिपीचा अभ्यास केला. कर्मचाऱ्यांच्या घेतलेल्या जबाबावरून त्यांनी याची माहिती पुढे आणली आहे.
दर शुक्रवारी, पौर्णिमेला आणि नवरात्रोत्सवात दररोज देवीचा पालखी सोहळा मंदिर आवारात होतो. त्यासाठीही तीन मशाली पेटविल्या जात होत्या. त्यानंतरचा बराच काळ मशाली आणि डोक्यावर घेतलेल्या रॉकेलवरच्या बत्तीच्या उजेडात पालखी सोहळा सजायचा. १९७० च्या दशकात विद्युत यंत्रणा आल्यानंतर मंदिरातही तुरळक प्रमाणात विजेचे बल्ब लावले. नवरात्रोत्सवात मंदिरांची रोषणाई करताना नवाल पट्ट्या असलेल्या बल्बच्या माळा लावल्या जात होत्या. सध्या बदललेल्या तंत्रज्ञानामुळे मंदिर परिसर हायमास्ट, एलईडी बल्ब आणि कायमस्वरूपी रंगीत एलईडीने सर्व शिखरांनी उजळले आहे.
पूर्वी मंदिरात ८४ कंदील होते. पालखी सोहळ्यासाठी तीन मशालींचा उजेड केला जायचा. विज्ञान बदलत गेले तसे मंदिरातील विद्युत यंत्रणाही बदलली. मात्र, पालखी सोहळ्यात आजही मशालींचा वापर केला जातो.
- डॉ. उदयसिंह राजेयादव
कार्यक्रम असेल तशी विद्युतरोषणाई बदलली जाते. पालखी सोहळ्यात मशाल आहेच शिवाय पालखीच्या आकाराप्रमाणे पालखीवरही विद्युतरोषणाई केली जाते.
- रामभाऊ वांद्रे,
Navratri In Kolhapur : श्री. अंबाबाईची पूजा कमलालक्ष्मी रुपात, कसा असतो कोल्हापूरचा नवरात्रोत्स? रोज रात्री पालखी सोहळा...विद्युत विभागप्रमुख, अंबाबाई मंदिर
Q1. अंबाबाई मंदिरात पूर्वी किती कंदील होते?
➡️ एकूण ८४ कंदील होते; गाभाऱ्यात दोन कंदील होते.
Q2. पालखी सोहळ्यासाठी किती मशाली पेटवल्या जात होत्या?
➡️ तीन मशाली पेटवल्या जात.
Q3. मंदिरातील ही ऐतिहासिक माहिती कुठून समजली?
➡️ उदयसिंह राजेयादव यांच्या ‘करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मोडी कागदपत्रे’ (खंड-२) मधून.
Q4. मंदिरात वीज केव्हा आली?
➡️ १९७० च्या दशकात विजेचे बल्ब लावले जाऊ लागले.