भारतात प्रतिभावंत क्रिकेटपटूंची काहीच उणीव नाही. एकापेक्षा एक सरस खेळाडू भारतीय भूमीत घडले आहेत आणि घडत आहेत. पण काही खेळाडू यासाठी अपवाद ठरले आहे. मग सचिन तेंडुलकर असो की महेंद्रसिंह धोनी… या सारखे काही दिग्गज खेळाडू वेगळ्याच पंगतीत बसतात. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं नाव येतं. दोघं आता फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. कारण त्याने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. असं असताना गेल्या काही महिन्यांपासून हे दोन्ही खेळाडू क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहेत. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही वनडे मालिका झालेली नाही. आता पुढच्या महिन्यात भारतीय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे आणि वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत दोघं खेळतील अशी चर्चा आहे. असं असताना या दोघांना टीम इंडियाचा निवड समिती अध्यक्ष अजिक आगरकर याने फोन लावला होता. तसेच ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध वनडे सामना खेळावा अशी चर्चा केली आहे. रोहित शर्मा तयार आहे, पण विराट कोहलीने मौन बाळगलं आहे.
रेव स्पोर्ट्सच्या दाव्यानुसार, विराट कोहलीने या प्रकरणी मौन बाळगलं आहे. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळणार की नाही याबाबत काहीच बोलला नाही. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध भारताचा संघ जाहीर केला आहे. पण या संघात विराट कोहली आणि रोहित शर्माचं नाव नाही.रोहित शर्मा या मालिकेत खेळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका 30 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. 3 ऑक्टोबरला दुसरा, तर 5 ऑक्टोबरला तिसरा वनडे सामना होणार आहे. यानंतर टीम इंडिया तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
🚨TEAM WANTED ROHIT & KOHLI FOR INDIA A SERIES, DOUBTS OVER KOHLI’S PLANS
“Chief selector Ajit Agarkar recently spoke to Virat Kohli regarding his future in ODIs, but Kohli’s silence has raised some concerns. The team management had hoped for both Rohit Sharma and Kohli to… pic.twitter.com/KYDNGCgTJy
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12)
ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा विचार करता निवड समिती या दोघांना ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळण्यास सांगत आहे. पण विराट कोहली त्याच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये. विराट कोहली त्याच्या कुटुंबियांसोबत तिथे फिरत असल्याचा एक फोटो समोर आला आहे. तर रोहित शर्मा बंगळुरच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये फिटनेसवर काम करत आहे. रोहित शर्मा सराव करत असल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. त्यामुळे इंडिया ए संघात खेळेल अशी चर्चा रंगली आहे.