'दशावतार' सिनेमा फक्त 99 रुपयात पाहता येणार? कधी, कुठे कसा? ते जाणून घ्या!
esakal September 24, 2025 12:45 AM

मराठी सिनेसृष्टीत सध्या चर्चेत असलेला सिनेमा 'दशावतार'ने कोट्यवधीची कमाई केलीय. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून आजपर्यंत हाऊसफुल्ल आहे. अजूनही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होताना पहायला मिळतेय. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं प्रेक्षक तोंडभरून कौतूक करताना पहायला मिळताय.

दशावतार सिनेमाची ऑफर काय आहे?

दरम्यान अशातच आता दशावतार सिनेमाच्या निर्मात्यांना चाहत्यांना एक सुखद धक्का दिलाय. चित्रपटाला एवढी पसंती येत असल्याने निर्मात्यांनी प्रेक्षकांना 99 रुपयात सिनेमा पाहण्याची खास संधी दिली आहे. परंतु नक्की कधी कसं आणि केव्हा पाहता येणार? नक्की ऑफर काय आहे जाणून घेऊया...

कुठे आणि कधी पाहता येणार 'दशावतार' सिनेमा?

'दशावतार' सिनेमाने गेल्या काही दिवसात भरपूर कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर दशावतार सुपरहिट ठरलाय. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता निर्मात्याने आज म्हणजेच मंगळवारी (23 सप्टेंबर 2025) चित्रपटाचं तिकिट कमी करण्याचा निर्णय घेतलाय. देशभरातील काही निवडक सिनेमागृहामध्ये हा सिनेमा 99 रुपयाला पहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by @dashavatarfilm

दशावतार सिनेमातील कथा आणि दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली भूमिका याचे प्रेक्षक फॅन झाले आहेत. दिलीप प्रभावळकर यांनी लाखो प्रेक्षकांनी मनं जिंकली आहेत. कोकणात कथा ही दिलीप प्रभावळकर यांनी उत्कृष्ट पद्धतीने मांडलीय. त्यातच आता 99 रुपयांच्या ऑफरमुळे अजून हजारो प्रेक्षक चित्रपट पाहण्याची शक्यता आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकरसह, सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, महेश मांजेकर यांची भूमिका चर्चेचा विषय ठरलीय.

धनंजय माने इथेच राहतात का? अशी ही बनवाबनवी सिनेमाला 37 वर्ष पूर्ण, चित्रपटातील 'हे' डायलॉग आजही प्रेक्षकांच्या पसंतीस
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.