आशिया कप 2025 स्पर्धेतील करो या मरोचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असतील यात काही शंका नाही. या सामन्यात पाकिस्तानच्या बाजूने कौल लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. चांगली खेळपट्टी दिसतेय, फारसा बदल होईल असे वाटत नाही. आम्हाला बॅट आणि बॉलमध्ये सुधारणा करायची आहे. हा एक नवीन खेळ आहे, एक नवीन आव्हान आहे. आम्हाला आजच्या दिवसावर लक्ष केंद्रित करायचे आहे. कोणताही बदल नाही.’
श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका म्हणाला की, ‘मीही प्रथम गोलंदाजी घेतली असतीते. खेळपट्टी चांगली दिसतेय, आधी फलंदाजी करायला हरकत नाही. आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत, आम्हाला काही क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत खोली आहे. दोन बदल आहेत. थीकशन आणि करुणारत्ने आहेत. आम्हाला वाटले की आम्हाला एका अतिरिक्त गोलंदाजाची आवश्यकता असू शकते, म्हणूनच आम्ही फलंदाजी करू शकणाऱ्या गोलंदाजाला संघात आणले आहे.’
पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी सुपर 4 फेरीतील पहिला सामना गमावला आहे. श्रीलंकेला बांगलादेशकडून, पाकिस्तानला भारताने पराभूत केलं आहे. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. अन्यथा स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल. श्रीलंकेचा शेवटचा सामना भारताशी, तर पाकिस्तानचा शेवटचा सामना बांगलादेशशी होणार आहे.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, चारिथ असालंका (कर्णधार), दासुन शनाका, कामिंदू मेंडिस, चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आघा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद