अमरावती : विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अंबा व एकवीरा मातेच्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी यात्रेतील राजकमल चौकातील स्वागतकमान कोसळल्याने एकच गोंधळ उडाला.
कमानीखाली काही दुचाकी दबल्या असून यामध्ये कुणी जखमी झाले नसल्याचे किंवा जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. नवरात्रीनिमित्त भरणाऱ्या अंबादेवी व एकवीरा देवीच्या यात्रेत राजकमल चौक ते गांधी चौक दरम्यान महापालिकेने दहा स्वागतकमानी उभारण्याचे नियोजन केले आहे.
त्यासाठी निविदाप्रक्रिया करण्यात आली. मात्र यामध्ये कुणीही समोर आले नाही. सोमवारी (ता.२२) दुपारी झालेल्या जोराच्या पावसाने राजकमल चौकाकडून गांधी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील दुसऱ्या क्रमांकाची स्वागतकमान कोसळली.
त्याखाली सहा ते सात दुचाकी दबल्या व त्यांचे नुकसान झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली असून महापालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा उघडकीस आला. हा मार्ग काँक्रिटचा असल्याने स्वागतकमानीचे खांब खोलवर गाडलेले नसतात, त्यामुळे त्याची बांधणी मजबूत नाही.
Navratri In Kolhapur : श्री. अंबाबाईची पूजा कमलालक्ष्मी रुपात, कसा असतो कोल्हापूरचा नवरात्रोत्स? रोज रात्री पालखी सोहळा...कमानी उभारताना मजबुतीकडे दुर्लक्ष झाल्याने ती पावसाने कोसळली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने पोहोचून कमानीचा कोसळलेला सांगाडा उचलून रस्ता मोकळा केला. महापालिकेकडून अद्याप यावर कुणीही स्पष्टीकरण दिलेले नाही.