ओतूर, ता. २४ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त गाडगे महाराज विद्यालयात ज्ञान आरोग्य व संस्कार शिबिराचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापक संपत माने यांनी दिली.
यावेळी बोलताना डॉ. रश्मी घोलप म्हणाल्या की, ‘‘भारताचा सुजाण नागरिक होण्यासाठी उन्नत होणे गरजेचे आहे. ज्ञान, शक्ती व संस्काराचा ज्ञान जागर झाला पाहिजे. दुर्गाशक्तीचा जागर करायचा आहे. आपण प्रतिज्ञा म्हणत असतो भारत माझा देश आहे व सारे भारतीय माझे बांधव आहे अशी जाणीव आपल्याला होणे गरजेचे आहे.’’ प्रास्ताविक डॉ. अमित काशीद यांनी केले.
यावेळी डॉक्टर असोसिएशन नवरात्र उत्सव कमिटीअध्यक्ष डॉ. अमित काशीद, डॉ. संजय वेताळ, डॉ. पुष्पलता शिंदे, डॉ.वैभव गायकर, डॉ. हर्षाली खेडकर, डॉ. शशांक फापाळे, डॉ. शुभांगी काशीद, जयेश नवले, श्रवण जाधव, गाडगे महाराज विद्यालयाचे पर्यवेक्षक कैलास महाजन, अशोक पाटील, सुनील पोकळे, शोभा तांबे उपस्थित होते.