संत ज्ञानेश्वर महाराज हे वैश्विक संत ः डॉ. सबनीस
esakal September 25, 2025 04:45 AM

भोसरी, ता. २४ ः ‘‘संत ज्ञानेश्वर महाराज हे वैश्विक संत असून त्यांचे तत्वज्ञान हे सर्वांना सामावून घेणारे आहे. भेदरहित आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चारही भावंडे हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यामध्ये मुक्ताईचा अधिकार मोठा आहे आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात कीर्तनकार सुभाष महाराज गेठे यांच्या ताटीच्या अभंगावरील प्रवचनाचे ‘श्री संत मुक्ताईंचे ताटीचे अभंग व चरित्र’ आणि प्रा. दिगंबर ढोकले लिखित ‘सूत्रसंचालनाचे अंतरंग’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शांतीब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर, डॉ. नारायण महाराज जाधव, सुनिताराजे पवार, बाजीराव चंदिले महाराज, उल्हास महाराज सूर्यवंशी, महेश महाराज भगुरे, राजेश अगरवाल, सुदाम भोरे आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, पंडित गवळी, सागर गवळी, अशोक पगारिया, प्रवीण ढोकले, अरुण बोऱ्हाडे, शिवलिंग ढवळेश्वर, राहुल गवळी, सतीश गोरडे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी ग्रंथ दिंडीत श्रीराम विद्या मंदिराच्या विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या नाटिकेने उपस्थितांचे लक्ष वेधले. मीरा काटमोरे, भार्गव जाधव, महेश महाराज भगुरे यांनी ताटीचे अभंगांचे गायन केले. मुरलीधर साठे यांनी स्वागत केले. डॉ. रोहिदास आल्हाट यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद आवटे यांनी आभार मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.