Delicious and tasty Anarase दिवाळी स्पेशल अनारसे पाककृती
Webdunia Marathi October 12, 2025 07:45 PM

अनारसे हा महाराष्ट्रीयन गोड पदार्थ असून जो विशेषश करून दिवाळीच्या सणात बनवली जातो. तर चला अनारसे बनवण्याची सोपी पाककृती जाणून घेऊ या...
साहित्य-
तांदूळ - एक वाटी
खसखस - दोन चमचे
गूळ - ३/४ वाटी
पाणी - १/४ वाटी
तूप
मीठ चिमूटभर

ALSO READ: Diwali Sweet Recipe : बेसनाचे लाडू

कृती-
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुऊन ३-४ दिवस पाण्यात भिजवावेत. दररोज पाणी बदलावे. आता चौथ्या दिवशी तांदूळ निथळून सावलीत वाळवावेत. पूर्णपणे कोरडे झाल्यावर बारीक कुटून पीठ बनवावे. आता एका पॅनमध्ये गूळ आणि पाणी घालून मंद आचेवर गूळ वितवावा. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर गाळून घ्या. आता गुळाचा पाक एकतारी होईपर्यंत उकळवावा. आता तांदळाच्या पिठात हळूहळू गुळाचा गरम पाक घाला आणि पीठ मळा. पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल नसावे. मळलेल्या पिठात एक चमचा तूप घालून चांगले मळावे. पीठ मऊ आणि एकजीव होईल. मळलेले पीठ रात्रभर झाकून ठेवावे. आता पिठाचे लहान गोळे बनवावेत. एका ताटलीत किंवा प्लास्टिक शीत वर खसखस पसरावी. प्रत्येक गोळा खसखशीवर ठेवून हलक्या हाताने पातळ गोल थापावे. आता कढईत तूप गरम करावे आणि अनारसे तुपात हलक्या हाताने सोडावेत. खसखशीची बाजू वर ठेवावी. तसेच मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळावे. तळलेले अनारसे टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तूप निथळू द्यावे. थंड झाल्यावर अनारसे हवाबंद डब्यात ठेवल्यास पंधरा दिवस टिकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: धनत्रयोदशीला भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीसाठी बनवा या रेसिपी

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: Diwali Sweet Dish : बदामाची बर्फी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.