मोठी बातमी! अमेरिकेला थेट बाहेरचा रस्ता… डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, थेट टॉप 10 मधून…
GH News October 15, 2025 07:14 PM

परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. अशातच आता हेन्ली पासपोर्ट क्रमवारी जाहीर झाली आहे. याद्वारे कोणत्या देशाचा पासपोर्ट ताकदवान आहे हे समोर आले आहे. ज्या देशाच्या पासपोर्टची ताकद जास्त असते त्या देशाच्या नागरिकांना दुसऱ्या देशात व्हिसा फ्री एन्ट्री मिळते. या यादीत आता अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचा पासपोर्ट टॉप 10 मधून बाहेर पडला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेचा पासपोर्ट सर्वात जास्त ताकदवान देशांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर घसरला आहे. गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच अमेरिकेचा पासपोर्ट टॉप टेनमधून बाहेर पडला आहे. याचाच अर्थ जगातील देश हे अमेरिकेवर नाराज आहेत. या देशांचा अमेरिकेवरील विश्वास कमी झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर भारतासाठीही वाईट बातमी आहे. हेनले पासपोर्ट क्रमवारीत भारताचीही घसरण झाल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेला मोठा फटका

अमेरिकेने टॅरिफ लादल्य़ानंतर ब्राझीलने म्हटले होते की, तुम्ही आमच्या नागरिकांना व्हिसा विचारता, त्यामुळे आता आम्हीही तुमच्या नागरिकांसाठी व्हिसा सक्ती करणार आहेत. काही दिवसांपूर्वी चीनने युरोपमधील अनेक देशांनी व्हिसा फ्री एन्ट्री देण्याची घोषणा केली आहे. मात्र यात अमेरिकेचा समावेश नाही. टॅरिफच्या निर्णयानंतर अनेक छोट्या देशांनीही अमेरिकन नागरिकांच्या व्हिसाबाबत नियम कडक केले आहेत. याचाच अर्थ जे देश अमेरिकेसमोर झुकत होते ते आता अमेरिकेविरोधात नियम बनवत आहेत. याच कारणामुळे अमेरिकन पासपोर्टची ताकद कमी झाली आहे.

भारताचीही घसरण

भारताचा पासपोर्टही कमकुवत झाला आहे. गेल्या वर्षी भारत 80 व्या क्रमांकावर होता, मात्र यंता भारत 85 व्या क्रमांकावर घसरला आहे. भारताच्या नागरिकांना 57 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी भारत हा 77 व्या क्रमांकावर होता. मात्र आता भारताची क्रमवारी आणखी घसरली आहे. मात्र चीनच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. 2015 मध्ये हा देश 94 व्या स्थानावर होता, आता 2025 मध्ये चीन 64 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हे देश आघाडीवर

  1. सिंगापूर – 193 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री
  2. दक्षिण कोरिया – 190 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री
  3. जपान – 189 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री
  4. जर्मनी, इटली, लक्झेंबर्ग, स्पेन, स्वित्झर्लंड – 188 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री
  5. ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड्स – 187 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री
  6. ग्रीस, हंगेरी, न्यूझीलंड, नॉर्वे, पोर्तुगाल, स्वीडन – 186 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री
  7. ऑस्ट्रेलिया, झेक प्रजासत्ताक, माल्टा, पोलंड – 185 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री
  8. क्रोएशिया, एस्टोनिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई), युनायटेड किंग्डम (यूके) – 184 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री
  9. कॅनडा – 183 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री
  10. लाटविया, लिकटेंस्टाइन – 182 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री
  11. आइसलँड, लिथुआनिया – 181 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री
  12. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए), मलेशिया – 180 देशांमध्ये व्हिसा फ्री एन्ट्री
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.