आपले दोन शेजारील देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या विळ्या भोपळ्याचे नाते आहे. दोन्ही देशातील तणाव प्रचंड वाढला आहे. अशात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर युद्धसदृश्य वातावरण आहे. याच चार प्रमुख हस्तींची भूमिका पाकिस्तानसाठी मोठे आव्हान बनली आहे. नूर वली महमूद, हाफीज साद रिझवी, हिबतुल्लाह अखुंडजादा आणि इमरान या त्या चार व्यक्ती आहेत.
पाकिस्तानच्या शहबाज सरकारच्या अडचणी हे चार जण वाढवत आहेत. चला तर या चारही लोकांच्या संदर्भात विस्ताराने पाहूयात..
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) चे प्रमुख मुफ्ती नूर वली महसूद यांनी पाकिस्तानसाठी धोका वाढवला आहे. पाकिस्तानने अलिकडेच काबूल येथील TTP च्या तळांवर एअरस्ट्राईक करुन त्यांना नष्ट केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात मुफ्ती नूर वली महसूद याला ठार केल्याचे वृत्तही आले होते. परंतू अफगानच्या तालिबानींनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. मुफ्ती नूर वली २००३ पासून टीटीपीमध्ये सामील आहे. मुल्ला फझलुल्लाह याच्या मृत्यूनंतर त्याला या गटाचे प्रमुख बनवले आहे. दक्षिण वजीरिस्थानमध्ये त्याचा जन्म झाला आणि त्यान आपले धार्मिक ज्ञान जिहादमध्ये बदलून टाकले आहे. टीटीपीने अनेक हल्ले आणि अतिरेकी कारवायामागे त्याचे नाव जोडलेले आहे. पाकिस्तानसाठी त्याच्या प्रभावाचा सर्वात मोठा धोका हा आहे की सीमेवरील पाकिस्तानी सैन्य चौक्यांवर हल्ला करण्याची त्याची क्षमता आहे.
पाकिस्तानसाठी सीमेवर सर्वात मोठे आव्हान तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंडजादा यांचे आहे. त्यांना अमीर अल-मुमिनिन म्हटले जाते. आणि अफगाणिस्तानपासून पाकिस्तानपर्यंत मुजाहिदांना आश्रय देण्याचा आरोप आहे. त्यांच्या आदेशाने टीटीपी आणि अन्य गट सक्रीय रहातात. ज्यामुळे पाकिस्तान-ए-अफगान सीमेवर तणाव कायम रहातो. ज्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत.
पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात हाफिज साद रिझवी, तहरीक-ए-लब्बॅकचे प्रमुख, सरकारसाठी मोठे आव्हान बनले आहे. ट्रम्पच्या गाझा पीस प्लानला विरोध करताना त्यांचा पक्ष पंजाब आणि लाहोर-इस्लामाबादपर्यंत मोठी निदर्शन केली आहेत. निदर्शनात आतापर्यंत शेकडो लोक मारले गेले आहेत आणि हजारो जखमी झाले आहे. रिझवी स्वत: जखमी आहेत. परंतू त्याचे वर्चस्व अजूनही कायम आहे. त्यांचा विरोध आणि हिंसक निदर्शनांमुळे पाकिस्ताच्या अंतर्गत मोठ्या ढवळाढवळी होत आहेत.
इमरान खान तुरुंगात आहेत. पाकिस्तानची माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षाचे प्रमुख असलेले इमरान खान राजकारणातही सक्रीय आहेत. ते लोकशाही सरकारला आव्हान देत आहेत. तसेच त्यांच्या पक्ष आणि राजकीय निर्णयांवर त्यांचे नियंत्रण तुरुंगात असूनही कायम आहे. KP च्या मुख्यमंत्री बदलणे आणि पार्टी अंतर्गत निर्णय त्यांच्या इशाऱ्यावर चालणे पाकिस्तानातील राजकीय अस्थितरता दाखवत आहे.