IND vs WI 2nd Test Live: 'तुम्हालाही माहित्येय तो OUT आहे, पण...'; जसप्रीत बुमराह Umpire वर संतापला, नको ते बोलून बसला...
esakal October 14, 2025 06:45 AM

India vs West Indies 2nd Test Marathi Cricket Update : वेस्ट इंडिजला फॉलो ऑन देण्याचा भारताचा डाव फसलेला दिसतोय. पहिल्या डावात २७० धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाने पाहुण्यांना पुन्हा फलंदाजीला बोलावले. ३५ धावांवर दोन विकेट्स मिळवल्या, परंतु त्यानंतर जॉन कॅम्बेल व शे होप यांनी १७७ धावांची भागीदारी करून विंडीजला आघाडीच्या दिशेने कूच करून दिली. ही जोडी तोडण्यासाठी कर्णधार शुभमन गिलने संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला बोलावले, परंतु त्यालाही अपयश आले. अशात अम्पायरच्या एका निर्णयावर जसप्रीतने तीव्र नाराजी व्यक्त केली.

भारताच्या पहिल्या डावातील ५ बाद ५१८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा २४८ धावा करता आल्या. कुलदीप यादवने पाच विकेट्स घेतल्या, तर रवींद्र जडेजाने ३ विकेट्स घेत विंडीजला फॉलऑन घेण्यास भाग पाडले. विंडीजचा दुसऱ्या डावातही ३५ धावांवर दोन धक्के बसले, परंतु जॉन कॅम्बेल व शे होप यांनी फलंदाजीला मदत करणाऱ्या खेळपट्टीचा फायदा उचलला. या दोघांनी तिसऱ्या दिवअखेरपर्यंत एकही विकेट पडू दिली नाही.

ICC Womens World Cup : ३३० धावा करूनही हरल्या, स्पर्धेबाहेर जाण्याचे संकट... कर्णधार हरमनप्रीत कौरने कोणावर फोडले खापर?

चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात कॅम्बेलने खणखणीत षटकार मारून कसोटीतील पहिले शतक पूर्ण केले. षटकार खेचून पहिले शतक झळकावणारा कॅम्बेल हा विंडीजचा पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी कॉलिन किंग, रॉबर्ट सॅम्युएल, रिडली जेकब्स व शेन डॉवरीच यांनी असे शतक झळकावले होते.

कॅम्बेल व होप यांनी २९५ चेंडूंत १७७ धावा जोडल्या. दरम्यान, कॅम्बेल ९४ धावांवर असताना जसप्रीतने पायचीतची अपील केली. ५५ व्या षटकात घडलेल्या या प्रकरणात मैदनावरील अम्पायरने नाबाद दिले आणि त्यानंतर तिसऱ्या अम्पायरकडे धाव घेतली गेली.

बुमराहच्या अप्रतिम इनस्वींग चेंडूवर कॅम्बेलसाठी पायचीतची अपील झाले, मैदानावरील अम्पायरने नाबाद दिले आणि भारताने DRS घेतला. चेंडूचा पॅडसोबत संपर्क होण्यापूर्वी बॅटला घासला होता. पण, तेही स्पष्ट होत नव्हते आणि तिसऱ्या अम्पायरने कॅम्बेलला नाबाद दिले. तेव्हा जसप्रीत म्हणाला, तुम्हाला माहित्येत तो बाद आहे, परंतु तंत्रज्ञान ते सिद्ध करू शकत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.