कोणता बदाम सर्वात महाग असतो, बदामाच्या या राजाचा एक किलोचा भाव किती, खाण्याची योग्य पद्धत काय ?
Tv9 Marathi October 14, 2025 08:45 AM

Almonds: ड्रायफ्रूटचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते. आज आपण बदामाची माहिती घेऊयात. बदामाला सुका मेव्याचा राजा म्हटले जाते. बदाम स्वादिष्ठ तर असतेच आणि त्याचे पोषणमूल्य भरपूर असते.बदामात प्रोटीन, फायबर,हेल्दी फॅट्स, विटामिन E, मॅग्नेशियम आणि एंटीऑक्सिडेंट तत्व असतात. जी शरीर,मेंदू आणि त्वचा या तिन्ही घटकांसाठी चांगली असतात.परंतू तुम्हाला माहिती आहे का बाजारात किती प्रकारचे बदाम मिळतात आणि सर्वात महागडा बदाम कोणता असतो. बाजारात मिळणाऱ्या बदामाची क्वालिटी आणि किंमत एकसारखी नसते. चला तर पाहूयात सर्वात महागडा बदाम कोणता आणि याला बदामाचा राजा का म्हटले जाते? या बदामाला कसे खायचे ? म्हणजे संपूर्ण पोषण मिळते…

कोणता बदाम सर्वात महाग ?

जगातील सर्वात महागड्या बदामाला ममरा बदाम ( Mamra Almond ) म्हटले जाते. ममरा बदाम इराण,अफगाणिस्तान, भारतातील काश्मीर आणि हिमालयीन प्रदेशात आढळतात. या बदामाची खासीयत काय ते पाहूयात…

ममरा बदामचे वैशिष्ट्ये काय ?

ममरा बदाम १०० टक्के नैसर्गिक असतो. त्याला कोणतीही पॉलीश किंवा केमिकल ट्रीटमेंट केलेली नसते. त्यामुळे तो महागडा असतो. ममरा बदामाचा आकार छोटा आणि अधिक सुरकुत्या पडलेला असतो. मात्र यात सामान्य कॅलिफोर्निया बदामापेक्षा ५० टक्के अधिक पोषण असते. यात हेल्दी फॅट्स (ओमेगा-3 आणि ओमेगा-6), प्रोटीन आणि मिनरल्सचे प्रमाण जादा असते. याला एनर्जी बुस्टर म्हटले जाते. खास करुन थंडीच्या दिवसात याचे सेवन फायदेशीर मानले जाते.

1 किलो वेग-वेगळ्या बदामाची किंमत काय?

बदामाची किंमत त्याचे प्रकार आणि क्वालिटीवर अवलंबून असते. खाली दिलेल्या किंमती अंदाजित आहेत ( २०२५ )

ममरा बदाम (Mamra Almond) इराण/अफगाणिस्तानात मिळतो. आणि त्याची किंमत 1800 – 3000 रुपये प्रति किलो असतो

कॅलिफोर्निया बदाम अमेरिकेत तयार होतो आणि त्याची किंमत 800 -1200 रुपये प्रति किलो असते

काश्मीरी बादाम भारतात तयार होतो आणि याची किंमत 1200 – 2000 रुपये प्रति किलो असते.

गिरी बादाम (तुकडा ) लोकल असतो याची किंमत 600 – 900 रुपये प्रति किलो असते.

ममरा बादाम सर्वात महागडा आणि ‘बदामचा राजा’ म्हटला जातो. याची किंमत सर्वसामान्य बदामापेक्षा तिप्पट असते.

बदाम खाण्याची योग्य पद्धत काय?

सकाळी उपाशी पोटी भिजवलेले बदाम खाणे लाभदायक असते. तुम्ही रात्री झोपण्याआधी ४ ते ६ बदाम पाण्यात भिजत टाका, आणि सकाळी त्याची साल काढून ते खा. यास तुम्ही कोमट दूधासोबत देखील खाऊ शकता.

किती बदाम खाणे योग्य ?

प्रोढ : रोज 5 ते 7 भिजलेले बदाम खाणे पुरेसे

मुले : रोज 2-3 भिजलेले बदाम खाणे योग्य

डायबिटीज असेल किंवा वजन कमी करणाऱ्यांनी न खारवलेले किंवा न भाजलेले बदाम खावेत

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.