चास, ता. १३ ः वाडा (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ९३२ बालकांना पोलिओ लसीकरण केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. तनय भोसले, डॉ. ऋतुजा सावंत यांनी दिली आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओ विजय दरवेळी हे घोषवाक्य घेऊन १२ ऑक्टोबर रोजी राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र वाडा अंतर्गत तीन उपकेंद्रातील बुरसेवाडी, कडधे, कमान येथे तसेच, मोबाईल व्हॅनव्दारे ९३२ बालकांना लसीकरण करण्यात आले.
आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण १९ बूथ व दोन मोबाईल व्हॅनची टीम तयार केली होती. त्यामध्ये महादेव पोळ, प्रकाश पाटील, सुधीर नेटके, ओंकार येरफुले यांनी जनजागृती करून मोबाईल व्हॅनव्दारे २५ बालकांना पोलिओचे लसीकरण केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात वाडा गावच्या सरपंच रूपाली मोरे यांनी या लसीकरणाचा प्रारंभ केला.
यावेळी अक्षय केदारी, जगदीश कदम, रमेश पिंगट, पायल कठाळे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. बुरसेवाडी आरोग्य उपकेंद्रात सरपंच संगीता तनपुरे यांनी लसीकरणाचा प्रारंभ केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. तनय भोसले, डॉ. ऋतुजा सावंत, आरोग्य निरीक्षक महादेव पोळ, आरोग्य सहाय्यिका ऊर्मिला दगडे, परिचारिका सविता मांजरे, आरोग्य कर्मचारी महादेव सानप, ओंकार येरफुले, प्रकाश पाटील, शीतल तटकारे, गटप्रवर्तक लता हुंडारे, कोमल वाळुंज, सुधीर नेटके, सर्व अशा वर्कर, अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी यशस्वी मोहीम राबवली.
03954