Diwali 2025 Gift Idea: यंदा दिवाळीत द्या अनोखे गिफ्ट, कमी खर्चात नातेवाईक अन् मित्रांना करा खुश
esakal October 14, 2025 06:45 AM

दिवाळीमध्ये युनिक गिफ्ट देण्याचा ट्रेंड आहे. पारंपारिक मिठाई बॉक्सऐवजी, लोक अर्थपूर्ण आणि शाश्वत भेटवस्तू निवडत आहेत. तुम्ही देखील पुढील वस्तू भेट देऊ शकता.

दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि उत्सवाची धूम वातावरणात दिसत आहे. बाजारपेठा दिवे, आकाशकंदील, झेंडूच्या माळा, सजावटीच्या वस्तूंने सजलेले आहे. आपल्या मनात अनेकदा एक प्रश्न येतो आणि तो म्हणजे 'या दिवाळीला प्रियजनांना काय द्यायचे? प्रत्येक दुकानात अनेक हॅम्पर्स, चमकदार मिठाईचे बॉक्स विक्रीस असतात. यंदा केवळ सुक्या मेव्याचा किंवा चॉकलेटचा बॉक्स न देता पुढील युनिक गिफ्ट देखील देऊ शकता.

फुलांपासून बनवलेला परफ्यूम

दिवाळीत खास गिफ्ट द्यायचे असेल तर खऱ्या फुलांपासून बनवलेला परफ्युम उत्तम पर्याय आहे. तुम्ही गुलाब, जास्मिन, कमळ यासारख्या सुंगधी फुलांचे परफ्युम भेट देऊ शकता.

सेल्फ केअर हॅम्पर

यंदा दिवाळीत प्रियजनांना सेल्फ केअर हॅम्पर भेट देऊ शकता. तुम्ही बाथ सोप,बेबी लोशन, कॅन्डल्स यासारखे खास गिफ्ट तसेच कुकींज गिफ्ट हॅम्पर देखील देऊ शकता.

चहा आणि कॉफी प्रेमींसाठी भेटवस्तू

तुमच्या प्रियजनांना टि ब्लेंड, कॉफी किट, आणि माचा बॉक्स गिफ्ट देऊन आनंदी करू शकता.

पारंपारिक मिठाई बॉक्स

दिवाळी हा सण मिठाईशिवाय अपुर्णच असतो. तुम्ही बेसण लाडू, सोन पापडी, मलाई पेढा यासारख्या पारंपारिक मिठाई गिफ्ट देऊन सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.

ऑरगॅनिक वस्तू गिफ्ट

या दिवाळीत ट्रेंड नैसर्गिक आणि अर्थपूर्ण असण्याचा आहे. सुंदर हस्तनिर्मित दगडी भांडी, सिरेमिक फुलदाण्या किंवा पितळी मेणबत्ती गिफ्ट देऊ शकता. या वस्तू केवळ सजावटीच्या नाही तर घरांमध्ये शांतता निर्माण करतात आणि घराची शोभा देखील वाढवतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.