कोगनोळी: राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथे उड्डाणपुलाजवळ रविवारी (ता. १२) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तासगाव येथील भाविक जागीच ठार झाला; तर त्याचा सोबती किरकोळ जखमी झाला. श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथील दर्शन करून गावी परत जात असताना ही घटना घडली. विजय जाधव (वय ३०) असे मृताचे नाव आहे. अशोक पवार (वय ३२) जखमीचे नाव आहे.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव येथील विजय जाधव व अशोक पवार रविवारी सकाळी श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर दोघेही दुचाकी (एमएच ०९ डीटी १७७९) तासगावकडे परतत होते. कोगनोळीजवळील नव्या उड्डाणपुलाजवळ त्यांनी पुढील वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी वळण घेणाऱ्या ट्रकने (एमएच १२, वायबी ४३१८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात विजय जाधव ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. अशोक पवार यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी तातडीने निपाणी येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले.
निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी निपाणी येथील सरकारी रुग्णालयात पाठवला. निपाणी ग्रामीण पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले असून, अपघातस्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचाही तपास सुरू आहे.
UPSC Success Story:'यूपीएससी परिक्षेत डिस्कळच्या दीपालीचा राज्यात डंका';आयएसएस अधिकारीपदी निवड; दोन्ही जुळ्या बहिणींचे सुयश तासगाववर शोककळाविजय जाधव यांच्या मृत्यूने तासगाव परिसरात शोककळा पसरली असून, गावातील नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ‘भाविक देवदर्शन करून परतताना देवाघरी गेला,’ अशा शब्दांत श्रद्धांजली व्यक्त केली.