वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दक्षिण अफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताला 3 गडी राखून पराभूत केलं. या पराभूत झालेल्या सामन्यात स्मृती मंधानाने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. बाबर आझमने दोन वर्षापूर्वी असा विक्रम प्रस्थापित केला होता. (फोटो- PTI)
स्मृती मंधानाने बाबर आझमसारखा विक्रम रचला म्हणजे नेमकं काय केलं? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. स्मृती मंधानाने वनडे क्रिकेटमध्ये वेगाने 5000 धावांचा पल्ला गाठला आहे. बाबर आझमने अशीच कामगिरी मेन्स वनडे क्रिकेटमध्ये केली आहे. आता महिला क्रिकेटमध्ये हा कारनामा स्मृती मंधानाच्या नावावर झाला आहे. (फोटो- PTI)
मेन्स क्रिकेटमध्ये वनडे क्रिकेटमध्ये कमी डावात 5000 धावा करण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने 97 डावात ही कामगिरी केली होती. बाबर आझमने 5 मे 2023 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळताना चौथ्या वनडे सामन्यात या विक्रमला गवसणी घातली होती. (फोटो- PTI)
आता दोन वर्षांनी स्मृती मंधानाने हा विक्रम वुमन्स क्रिकेटमध्ये रचला आहे. तिने 112 डावात वेगाने 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. स्मृती मंधानाने ही कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केली. स्मृती मंधानाने 66 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकार मारत 80 धावांची खेळी केली. यासह तिने हा विक्रम आपल्या नावावर केला होता. (फोटो- PTI)
मेन्स आणि वुमेन्स वनडे क्रिकेटमध्ये स्मृती मंधाना, बाबर आझम आणि हाशिम अमला यांनी वेगाने 5000 धावा केल्या आहेत. या तिघांचं नाव टॉप 3 फलंदाजांमध्ये येते. हाशिम आमलाने ही कामगिरी करण्यासाठी 101 डाव खेळले. (फोटो- PTI)