महाविकास आघाडीसह मनसे पक्षातील शिष्टमंडळ आज पु्न्हा निवडणूक आयोगाला भेटणार
Marathi October 15, 2025 10:25 AM

Maharashtra Live Updates: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) वज्रमूठ उगारलीय. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज (15 ऑक्टोबर) पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार आहेत. काल विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं. दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या दोन प्रमुख मुद्यांवर विरोधकांनी बोट ठेवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मात्र समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने आज पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकलिंगम हे दोघेही या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले, प्रकाश रेड्डी हे प्रमुख नेते उपस्थित असतील. या बैठकीनंतर महाविकास आघाडी, मनसे आणि इतर पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे. 

 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.