उधव ठाकरे-राजा ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची बैठक घेतली मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) वज्रमूठ उगारलीय. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज (15 ऑक्टोबर) पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार आहेत. काल (14 ऑक्टोबर) विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं.
दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या दोन प्रमुख मुद्यांवर विरोधकांनी बोट ठेवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मात्र समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने आज पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकलिंगम हे दोघेही या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीसाठी शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले, प्रकाश रेड्डी हे प्रमुख नेते उपस्थित असतील. या बैठकीनंतर महाविकास आघाडी, मनसे आणि इतर पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे.
निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्यासाठी चर्चा
लोकशाही बळकट करण्यावर चर्चा
स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका पारदर्शी व्हाव्या अशी मागणी
महाराष्ट्रातील मतदारयाद्यांचा घोळ दूर करावा अशी मागणी
निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सामान्यांच्या मनात खूपच शंका
खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे शंका उत्पन्न होत आहे
लोकसभा,विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाही?
एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते त्याला का सांगितले जात नाही?
निवडणूक आयोगाने नावं,त्याचा पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावी
विधानसभेला वापरलेली ऑक्टो 2024 ते जुलै 2025 दरम्यान नावं वाढवलेली यादी अजूनही का प्रसिद्ध नाही?
मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे
मतदार यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की, कोणाचा दबाव आहे?
निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली ? – राज ठाकरे
जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का ? – राज ठाकरे
दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव – राज ठाकरे
मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ – राज ठाकरे
वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी – राज ठाकरे
निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता ? – राज ठाकरे
31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का ? – राज ठाकरे
व्हिव्हिपॅट मशीन लावा – राज ठाकरे
मविआसह मनसेच्या शिष्टमंडळाने निवेदन देताना मुख्य निवडणूक आयुक्तांकडे अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण आणि उत्तर दिलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही असे दिनेश वाघमारे यांनी दिलंय.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा