Maharashtra Politics : काँग्रेसबरोबर जाण्यास राज ठाकरे अनुकूल : संजय राऊत
esakal October 15, 2025 12:45 PM

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसबरोबर जायला तयार असल्याचे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. तसेच आगामी निवडणुकांबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंगळवारी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद होणार आहे.

राऊत म्हणाले, की महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला बरोबर घेणे ही राज यांची इच्छा आहे. याचा अर्थ हा निर्णय नाही. महाविकास आघाडीत नवीन घटक पक्ष येणार असेल तर एकत्र बसून चर्चा करावी लागेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात सहभागी व्हावे यासाठी भाजपलाही पत्र पाठविले असल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली.

Nilesh Ghaiwal Case: घायवळचा आणखी एक कारनामा, Ahilyanagar Police गोत्यात येणार? | Pune News | Sakal News

मनसेची अधिकृत भूमिका राज ठाकरे हेच मांडतील. आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडतो, त्यामुळे युती-आघाडी बाबतची भूमिका आमचे प्रवक्ते किंवा राज ठाकरे मांडतील. बाकी कोणीही नाही. मंगळवारी मविआ नेत्यांबरोबर राज ठाकरे निवडणूक आयोगाची उद्या (ता.१४) भेट घेणार आहेत. निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ जात आहे, त्यामुळे हा विषय तेवढ्या पुरताच मर्यादित आहे.

- संदीप देशपांडे, नेते, मनसे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.