भोसरी, ता. १४ ः गेल्या तीन महिन्यांपासून भोसरी आणि दिघीत सुरू असलेल्या बौद्ध बांधवांच्या वर्षावासाची बुद्ध पूजा, धम्म प्रवचन, बुद्ध भीम गीते, अन्नदान आदी विविध कार्यक्रमांनी बुद्धविहारांत सांगता झाली.
भोसरीतील दिघी रस्त्यावरील स्वरांजली कला क्रीडा मंचाद्वारे आयोजित कार्यक्रमात भंते धम्मानंद यांनी धम्मदेसना दिली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे प्रवीण गडलिंग, अनिल आरू आदींनी शुभेच्छा दिल्या. पिंपरी चिंचवड बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, अमोल डोळस, शरद डोळस, सचिन चव्हाण, अरुण गायकवाड, राजेंद्र डोळस, दादाराव वानखेडे आदी उपस्थित होते. यावेळी अन्नदान करण्यात आले. आनंद सावंत, राहुल भगत यांचे बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचाचे संस्थापक प्रकाश डोळस, सिद्धार्थ पवार, प्रभाकर माने, देवानंद अंभोरे, रामचंद्र यादव आदींनी परिश्रम घेतले. राजेश थोरात यांनी सूत्रसंचालन केले; तर विजय भालेराव यांनी आभार मानले.
भोसरीतील दिघी रस्त्यावरील धम्मदूत मैत्री संघाद्वारे भदंत बुद्धघोष मेता थेरो यांची धम्मदेशना झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज डोळस होते. यावेळी निरंजन वानखेडे, भाऊराव गुडदे, सचिन पवार आदी उपस्थित होते. पल्लवी शेलार यांनी प्रास्ताविक केले. वसुधा तायडे यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा सरदार यांनी आभार मानले.
दिघीतील भारतरत्न मित्र मंडळाद्वारे पंचशील बुद्ध विहारात भंते धम्मानंद यांनी पंचशील ध्वजवंदन केले. यावेळी तनुजा कांबळे यांनी पंचशील ध्वजगीत गायले. भन्ते धम्मानंद यांनी धम्मदेशना दिली. भारतरत्न मित्र मंडळाचे सभासद व पंचशील बुद्ध विहाराच्या उपासिका यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. उषा ताजणे यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती बागुल यांनी आभार मानले.
भोसरीतील बालाजीनगरातील तथागत बुद्ध विहार आणि भारतीय बौद्ध महासभेच्या बालाजीनगर शाखेद्वारे भारतीय बौद्ध महासभा महिला अध्यक्षा रेखा ढेकळे, राधाकांत गुरुजी, माणिक निसर्गंध यांचे प्रवचन झाले. पंजाबराव कटके कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते. बुद्धविहाराचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ऋषिकेश कांबळे, वैजनाथ येडे, सुधाकर घरड, केशवकुमार शिंदे, रामलिंग धावारे, बलराज कटके आदी उपस्थित होते. मनिषा इंगळे, शालन भंडारे, संगीता साळवे आदींनी बुद्धविहारात फुलांची रांगोळी काढली. उपस्थितांना अन्नदान करण्यात आले.