मंचर, ता. १४ : येथील (ता.आंबेगाव) साईनाथ नागरी सहकारी पतसंस्था, मंचर यांच्या वतीने दिवाळीनिमित्त एकूण दोन हजार १३२ सभासदांना प्रत्येकी ७५० रुपयांचे किराणा साहित्य भेट देण्यात आले.
पतसंस्थेचे अध्यक्ष जया गिरीश समदडिया, उपाध्यक्ष संजय चव्हाण, संचालक वसंतराव बाणखेले, नंदकुमार पडवळ यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संचालक नरेंद्र धुमाळ, यावरअली मीर, मंगेश पवळे, नीलम पोखरकर, श्वेता काळे, तय्यब जमादार, राजेंद्र थोरात, सभासद नारायण निघोट मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शर्मा, तसेच प्रफुल शहा आदी उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून सभासदांना दिवाळीच्या मुहूर्तावर रवा, तूप, मैदा, साखर, बेसन, साबण, उटणे आदी किराणा साहित्य वाटप करण्याची परंपरा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष(स्व.) गिरीश समदडिया यांनी सुरू केली असून, ही परंपरा पुढेही कायम ठेवण्यात येईल, असे अध्यक्ष समदडिया आणि उपाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. साहित्य वाटपानंतर सभासदांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले होते.
यावेळी वसंतराव बाणखेले यांनी सांगितले की, नफा कमावणे पतसंस्थेचा उद्देश नसून, सभासदांना वेळेत कर्जपुरवठा करणे आणि त्यांच्या ठेवींवर आकर्षक व्याजदर देणे हे प्रमुख ध्येय आहे.”
साईनाथ पतसंस्थेने ३४ व्या वर्षात पदार्पण केले असून, मंचर, राजगुरुनगर, पाबळ आणि पेठ येथे शाखा कार्यरत आहेत. चालू वर्षात पतसंस्थेला दोन कोटी ३६ लाख २८ हजार रुपये निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप सुरू आहे, असे मंचर येथील साईनाथ पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शर्मा यांनी सांगितले.
14351