Vasu Baras Marathi Wishes: आली दिवाळी ,आली दिवाळी...! मित्रपरिवाराला अन् नातेवाईकांना पाठवा मराठीतून वसुबारच्या खास शुभेच्छा
esakal October 15, 2025 08:45 PM

वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण असून, या दिवशी गायींची पूजा केली जाते. मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना मराठीतून शुभेच्छा देऊन सण अधिक खास बनवा. वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Vasu Baras Marathi Wishes: दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी. या सणाचा पहिला दिवस वसुबारसने सुरू होतो. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसी गायींची पूजा केली जाते. तसेच नैवेद्य दाखवले जाते. या सणाला अधिक खास बनवण्यासाठी मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना मराठीतून खास शुभेच्छा देऊ शकता.

गाई म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या

लक्ष्मण कोणाचा, तर आई वडिलांचा

दे माय खोबऱ्याची वाटी,

वाघाच्या पाठीत घालीन काठी

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

गोमातेची करू मनोभावे पूजा

व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी

गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी

दिवाळीचा पहिला दिवस

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

स्नेहाच्या दिव्यात

तेवते वात तेजाची

वसुबारस म्हणजे

पूजाधेनु वासराची

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

दिवाळीचा पहिला सण

हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटींबीयांना

सुख,समृद्धीचे जावो

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

Vasubaras 2025: यंदा 17 की 18 कधी आहे वसुबारस? जाणून महत्व अन् पूजा विधी

गोमातेचा आशीर्वाद घेऊन

आनंदाची वाट

पुढे जाऊ

वसुबारसचा सण घेऊन

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

आज वसुबारस

दिवाळीचा पहिला दिवस

दिवाळी तुम्हाला आणि कुटूंबियांना

सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

वसूबारस या शब्दातील वसू म्हणजे धन

त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

दारी सजले तुळशी वृदांवन

त्यासवे होई कामधेनुचे पूजन

गोमातेच्या उपकारांचे करूणा स्मरण

साजरा करूया वसुबारस हा सण

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

गाय आणि वारसाच्या अंगी असणारी

वात्सल्या, उदारता

प्रसन्नता लाभो, हीच प्रार्थना

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

जिच्या सेवने सर्व संकट दूर होतात

अशा गाय मातेमध्ये आहे सर्व देवांचा अंश

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

गोमातेची करू मनोभावे पूजा

व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी,

गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी,

दिवाळीचा पहिला दिवस

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.