मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ट्रान्सजेंडर लोकांमधील वाद टोकाला गेला. नंदलालपुरा परिसरातील एका गटातील सुमारे २४ तृतीयपंथियांनी बंद खोलीत एकत्रितपणे फिनाईल प्यायले. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Nagpur Municipal Corporation Elections : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग; 6 नोव्हेंबरला प्रकाशित होणार प्रारूप मतदार यादीनागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रकाशित होणार आहे.
- प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना 14 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार
- 28 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी
- चार डिसेंबरला मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात येणार
Kolhapur News : वसतिगृह मारहाण प्रकरण; 'त्या' पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखलघुणकी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील शामराव पाटील शिक्षण संकुलातील रॅगिंग व विद्यार्थी मारहाणप्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर वडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ९ मार्चला या निवासी शाळेतील वसतिगृहात नऊ मुलांना मोठ्या वर्गातील पाच मुलांनी कमरेचा पट्टा, प्लास्टिक बॅट व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले होते. या प्रकरणाचा मोबाईलवर काढण्यात आलेला व्हिडिओ शुक्रवार १० ऑक्टोबर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या अमानुष मारहाणीच्या व्हिडिओमुळे शासकीय यंत्रणांनी शाळेची चौकशी सुरू केली. विविध संघटनांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. याप्रकरणी वडगाव पोलिसांनी विद्यार्थ्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले. त्यानुसार व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे मारहाण करणाऱ्या त्या पाच विद्यार्थ्यांविरोधात वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी तालुका पोषण आहार अधीक्षक प्रकाश नारायण नलवडे यांनी फिर्याद दिली.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील नंदगावात बारबालांचा नाच...कोल्हापूर जिल्ह्यातील नंदगाव इथ भटक्या समाजातील एका व्यक्तीने मित्रमंडळी, तसेच नातलगातील व्यक्तींना बोलवून बारबाला नाचविण्याचा प्रकार रात्री उघडकीस आला. इस्पूर्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या नंदगाव या गावात हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यावेळी गावातील तरुणांनी बारबालांचा नाच बंद पाडत बारबालासह आयोजक आणि त्यांच्या मित्रमंडळींना पोलिसांच्या ताब्यात दिले.
Bangalore News : आमदार पप्पींची अटक कायदेशीर असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णयबंगळूर : बेकायदेशीर बेटिंग कंपनी चालवण्याच्या आरोपांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले चित्रदुर्गचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांची अटक बेकायदेशीर घोषित करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १५) नकार दिला.
Gadhinglaj News : दूध उत्पादकांचा अन्यायी कपातीच्या विरोधात उद्या मोर्चागडहिंग्लज : गोकुळ दूध संघाने संस्थांना दूध फरकाची रक्कम दिली. मात्र, त्यातून ४० ते ४५ टक्के रक्कम कपात करून संघाच्या डिबेंचर्स ठेव खात्यात वर्ग केली आहे. ही कपात अन्यायी असून, त्या विरोधात गोकुळच्या लिंगनूरमधील शीतकरण केंद्रावर शुक्रवारी (ता. १७) दुपारी एक वाजता मोर्चा काढणार असल्याची माहिती दूध उत्पादक संघर्ष समितीने पत्रकातून दिली. यावेळी फरकातून रक्कम कपात करून केवळ ६० टक्के रक्कम आदा केली आहे. यापूर्वी संघाकडून केवळ पाच टक्क्यापर्यंत डिबेंचर्स कपात केले जात होते. परंतु, यंदा जादाचे कपात करून उत्पादकांची फसवणूक करून अन्याय केला आहे. याचा जाब विचारण्यासाठी मोर्चाचे आयोजन केल्याचे संघर्ष समितीचे तानाजी देसाई, कृष्णा पाटील, संजय देसाई, बसवराज मुत्नाळे, सुभाष पाटील, बाळगोंडा पाटील, अॅड. आप्पासाहेब जाधव, फुलाजी खैरे, सुरेश चौगुले, भिकाजी पाडेकर, सखाराम केसरकर आदींनी पत्रकातून कळविले आहे.
Kolhapur News : 'स्वाभिमानी'ची आज जयसिंगपुरात ऊस परिषद; महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकऱ्यांचे पहिल्या उचलीकडे लक्षजयसिंगपूर : येथे गुरुवारी (ता.१६) होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २४ व्या ऊस परिषदेत यावर्षी तुटणाऱ्या उसाला पहिली उचल किती मागितली जाणार आणि आंदोलनाचे स्वरूप कसे असणार याकडे महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Actor Pankaj Dhir : अभिनेते पंकज धीर यांचे कर्करोगाने निधनLatest Marathi Live Updates 16 October 2024 : जयसिंगपूर येथे आज (ता. १६) होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २४ व्या ऊस परिषदेत यावर्षी तुटणाऱ्या उसाला पहिली उचल किती मागितली जाणार आणि आंदोलनाचे स्वरूप कसे असणार याकडे महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच छोट्या आणि मोठ्या पडद्यावर दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे आणि ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते पंकज धीर (वय ६८) यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. राज्यातील विरोधी पक्षांनी आज सलग दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व निवडणूक आयुक्त यांची भेट घेत मतदारयाद्यांमधील गैरप्रकार दूर करण्याची मागणी केली. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाचे ‘सर्व्हर’ बाहेरून कोणीतरी चालवत असल्याचा गंभीर आरोपही विरोधकांनी केला. महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम असताना, पावसासाठी पोषक हवामान आहे. उद्या (ता. १६) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..