पुणे, ता. १५ ः पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’ला स्वयंसेवी संस्थांचीही मदत मिळत असून, अन्नदान मंडळ, फाउंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्ट मदतीसाठी पुढाकार घेत मदत करत आहेत. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलीफ फंड’ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाला मदतीचे आवाहन केले आहे.
गड-किल्ले स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीसाठी ‘सिंहगड हाफ मॅरेथॉन’सारख्या अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या पुण्यातील ‘स्वानंद सोशल फेडरेशन’तर्फे पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’ला एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. ‘सुमीतजीवी चॅरिटेबल फाउंडेशन’तर्फे पूरग्रस्तांसाठी ५१ हजार १११ रुपयांची मदत देण्यात आली. ‘संत तुकाराम अन्नदान मंडळा’तर्फे ५१ हजार रुपयांची मदत करण्यात आली.
याशिवाय कर्णबधिरांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या सुहृद मंडळ, पुणे संचालित चिंचवड बधिर मूक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’ला ११ हजार १५१ रुपयांची मदत दिली, तर चिंचवडमधील ‘समर्थ शिक्षण मंडळ’ संचालित मनोरम प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या खाऊच्या पैशांमधून पूरग्रस्तांसाठी २० हजार रुपयांची मदत दिली.
-----------------------------------------------
मदतीचे आवाहन
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता समाजाला ‘सकाळ रिलीफ फंड’कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
मदत करण्यासाठी:-
१. IDBI Bank
Name :- Sakal Relief Fund
A/C No: 45910010013026
IFSC: IBKL0000459
Branch :- Laxmi Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता किंवा सोबत दिलेला QR कोड स्कॅन करून ‘गुगल पे’ व ‘फोन पे’वरून देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सअॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.
२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलीफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत स्वीकारले जातील.
-----------------