swt१६१२.jpg मध्ये फोटो आहे.
हरियाणा ः जगतगुरू सत्यदर्शी संत रामपालजी महाराज यांना ‘मानवता रक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संत रामपालजी महाराजांना
‘मानवता रक्षक’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः हरियाणाच्या प्राचीन आाणि प्रभावशाली महम चौविसी खाप पंचायतीकडून जगतगुरू सत्यदर्शी संत रामपालजी महाराज यांना ‘मानवता रक्षक’ हा ऐतिहासिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजसेवा, मानवतेसाठी अखंड कार्य माणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला. हा भव्य सन्मान सोहळा महम चॉबिसी चदूतन्यावर उत्साहात आणि भक्तिभावामध्ये आला. कार्यक्रमाला हरियाणातील नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, अधिकारी आाणि संत समाजाचे लाखो अनुयायी उपस्थित होते. मंचावर संत रामपालजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत खाप पंचायतीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना मानवतेचा खरा सेवक म्हणत सन्मान केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शांतता, एकता आणि सत्यभक्तीचा संदेश पसरवण्याची शपथ घेतली. हा दिवस हरियाणाच्या इतिहासात मानवता आणि अध्यात्म यांचा संगम घडवणारा दिवस म्हणून सदैव स्मरणात राहील, असे उपस्थितांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भाविक या सोहळ्याला उपस्थित होते.