swt१६९.jpg मध्ये फोटो आहे.
मांडखोल : दिविजा वृद्धाश्रमास विद्यार्थ्यांनी आभारपत्र दिले.
असलदे दिविजा वृद्धाश्रमास
मांडखोल शाळेतर्फे आभारपत्र
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः जिल्हा परिषद शाळा चौके मांडखोल (ता. मालवण) शाळेच्या वतीने दिविजा वृद्धाश्रमास आभारपत्र देण्यात आले. चौके मांडखोल शाळेच्या वतीने दिविजा वृद्धाश्रम असलदे-गावठाणवाडी (ता. कणकवली) या संस्थेकडून सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी सुगंधी उटणे वाटप करण्यात आले होते. त्यानिमित्ताने सर्व मुलांनी पोस्टकार्डच्या माध्यमातून या आजी-आजोबांनी तयार केलेल्या कामाप्रती आभारपत्र लिहून दिवाळीचा गोड संदेश दिला. सध्याच्या आधुनिक युगात पत्रलेखन कालबाह्य होत असताना मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेले हे नावीन्यपूर्ण काम निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमासाठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुषण ढवण व मुख्याध्यापक दीपक गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक. पालक व माजी विद्यार्थ्यांनी कौतुक केले.
..................
टीपः swt१६११.jpg मध्ये फोटो आहे.
कुडाळ ः इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याचा उपक्रम घेण्यात आला.
कुडाळ इंग्रजी शाळेत साकारले
पर्यावरणपूरक आकाशकंदील
कुडाळ, ता. १६ ः क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत दीपावली सणाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याचा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपली कलादृष्टीचे दर्शन घडविले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख यांच्या प्रेरणेतून शाळेत विविध शालेय तसेच सहशालेय पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात. विदयार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच त्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला. दीपावली सणाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा एक उपयुक्त प्रयत्न शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांच्या माध्यमातून व्यक्त झाला. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका शेख यांचे सहकार्य लाभले. प्रशालेचे शिक्षक सूरज गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.