ओतूर, ता. १५ : ओतूर (ता. जुन्नर) येथे अहिनवेवाडी मार्गे आंबेगव्हाण येथे दुचाकीवर बिबट्याने हल्ला करून एका व्यक्तीला जखमी केले.
या हल्ल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजता घडली असून यात शांताराम तुळशीराम भुतांबरे (वय ५०, रा. आंबेगव्हाण) जखमी झाले. हल्ल्यानंतर भुंताबरे यांना उपचारासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गोरे यांनी त्यांच्यावर उपचार केले.