राजेगाव, ता. १७ : दौंड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाश्वत शेती आणि अन्नसुरक्षा या विषयांवर ज्ञान मिळवण्यासाठी वडगाव दरेकर (ता. दौंड) येथील प्रगतशील शेतकरी माऊली कापसे यांच्या शेताला शैक्षणिक भेट दिली. शेताच्या बांधावर जाऊन विद्यार्थ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींबाबत प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळवणे हा उपक्रमाचा उद्देश असल्याची माहिती प्राचार्या स्वाती कणसे यांनी दिली.
शेतकरी कापसे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शेतातील ठिबक सिंचन व्यवस्था, कंपोस्ट खत निर्मिती, पिकांचे फेरपालट व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच आधुनिक शेतीतील नवनवीन संधी, तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरणाशी मैत्रीपूर्ण शेती कशी करता येते याबाबत मार्गदर्शन केले.
कृषी अधिकारी शिवाजी कदम यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तरे देत शाश्वत विकासाची संकल्पना आणि जीवनाशी असलेला संबंध समजावून सांगत विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरणाशी मैत्रीपूर्ण शेती कशी करता येते याबाबत माहिती दिली. यावेळी प्रशासकीय प्रमुख नितीन करे, गणेश कापसे, दादा भुजबळ, संयोजक अतुल मोरे, शिक्षक अनुराग गोयल, राहुल हतागळे आदी उपस्थित होते
RJG25A01480