थोडक्यात:
वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच ट्रॅकवर धावायला सुरुवात करेल, ज्यात प्रीमियम एसी कोच आणि आधुनिक सुविधा असतील.
ही ट्रेन महाराष्ट्रातील लातूर येथे BEML कंपनीद्वारे तयार केली जात आहे, जी ICF तंत्रज्ञान वापरत आहे.
KINET Railway Solutions या भारत-रशियन संयुक्त उपक्रमाला १२० ट्रेनसेट्स तयार करण्याचा कंत्राट मिळाले असून पहिला प्रोटोटाइप जून 2026 पर्यंत येईल.
Vande Bharat Sleeper Train: भारतीय रेल्वे आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच लोकांसाठी सुरू करणार आहे. ही ट्रेन प्रवासात एक नवीन पर्व घेऊन येईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, हाय- स्पीड वंदे भारत ट्रेनची दुसरी युनिट पूर्णपणे तयार झाल्यानंतर, वंदे भारत स्लीपर ट्रेन ट्रॅकवर धावण्यास सुरुवात होईल. या स्लीपर ट्रेनचे कोच BEML कंपनी तयार करत आहे.
या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी आरामदायी आणि आधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. पहिला एसी कोचमध्ये आरामदायी बेड्स, चार्जिंग पॉईंट, सेन्सर लाइटिंग आणि प्रीमियम क्वालिटीच्या सीट्स दिल्या आहेत. मोबाईल आणि वॉटर बॉटल होल्डर्स या सारखी विविध सोयी सुविधा प्रवाशांच्यासोयीसाठी करण्यात आली आहे.
Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त ५ मिनिटांत बनवा पौष्टिक ज्वारीचं घावन, पहा रेसिपीचा व्हिडिओ कुठे तयार होत आहे ट्रेन?ही ट्रेन महाराष्ट्रातील लातूर येथे बनवली जात आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की दुसरी ट्रेन पूर्ण तयार झाल्यावरच वंदे भारत स्लीपर ट्रेन ट्रॅकवर आणली जाईल. BEML ही कंपनी सध्या या ट्रेनचे उत्पादन करत आहे, आणि ती इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) च्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
भारतीय आणि रशियन कंपनीचा संयुक्त उपक्रमKINET Railway Solutions ही भारताची RVNL (रेल विकास निगम लिमिटेड) आणि रशियाची CJSC Transmashholding या कंपन्यांची संयुक्त भागीदार आहे. यांना एकूण १२० वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट ( १९२० कोच) तयार करण्याचे कंत्राट मिळाले आहे, आणि या कोचेसचं देखभाल कार्य देखील पुढील ३५ वर्षापासून त्यांच्याकडे असेल. तसेच रेल्वेच्या नियोजनानुसार, एकाच वेळी दोन वंदे भारत स्लीपर ट्रेनचं उद्घाटन करण्यात येणार आहे. पहिला प्रोटोटाइप जून 2026 पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.
Rawdogging Flights: ना पुस्तक, ना संगीत, ना मुव्ही... काय आहे Raw-Dogging फ्लाइट ट्रेंड? लांबच्या प्रवासाच्या फ्लाइटमध्ये हळू हळू फॉलो होतोय FAQs1. वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरु होईल? (When will the Vande Bharat Sleeper train start?)
पहिला प्रोटोटाइप जून 2026 पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे, त्यानंतर ट्रेन ट्रॅकवर धावायला सुरुवात होईल.
2. ही ट्रेन कुठे तयार केली जात आहे? (Where is this train being manufactured?)
वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रातील लातूर येथे BEML कंपनीद्वारे तयार केली जात आहे.
3. या ट्रेनमध्ये कोणत्या सुविधांचा समावेश आहे? (What facilities are included in this train?)
आरामदायी बेड्स, चार्जिंग पॉईंट, सेन्सर लाइटिंग, मोबाइल आणि वॉटर बॉटल होल्डर्स सारख्या प्रीमियम सुविधा या ट्रेनमध्ये असतील.
4. कोणत्या कंपन्यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करण्याचे कंत्राट मिळवले आहे? (Which companies have the contract to manufacture the Vande Bharat Sleeper train?)
KINET Railway Solutions ही भारताची RVNL आणि रशियाची CJSC Transmashholding यांचा संयुक्त उपक्रम या ट्रेनचे उत्पादन आणि देखभाल करत आहे.