Diwali Kids' Safety Tips: दिवाळीत फटाक्यांच्या मजेत मुलांची सुरक्षितता जपा! जाणून घ्या काही आवश्यक टिप्स
esakal October 17, 2025 09:45 AM

Keep Your Children Safe This Festive Season: दिवाळी म्हणजे आकाशकंदील, दिवे, फराळ, मिठाई, रांगोळी, नवीन कपडे, लाईटच्या माळांचा झगमगाट आणि सर्वात आकर्षक असणारे फटाके. दिवाळी या फटाक्यांच्याशिवाय अपूर्णच असते. फुलबाजी, पाऊस, भुईचक्र, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब हे तर सगळ्यांचाच आवडीचे फटाके. लहानमुलांना दिवाळीत सर्वात जास्त हेच आकर्षक वाटत असतं. त्यामुळे त्यांची उत्सुकता शिगेला पोचलेली असते. पण फटाके म्हणले की येते ती दारू, आग आणि त्यामुळे होणारे अपघात.

प्रत्येक वर्षी अनेक लहान मुलं चटका बसणे, डोळ्याच्या आणि कानाच्या दुखापती अशा समस्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती होतात. हे केवळ निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणे हाताळलेल्या फटाक्यांमुळे होते. त्यामुळे तुमच्या मुलांना फटाके देताना काही दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

Diwali Window Cleaning Tips: या दिवाळीत खिडक्या करा चमकदार! घरगुती सोप्या उपायांनी मिळवा नव्यासारखी झळाळी मुलांनाच जास्त धोका का असतो?

लहान मुलं आधीच खूप उत्साही असतात. सणासुदीच्या वेळी त्यांचा हा उत्साह अधिक प्रमाणात वाढलेला असतो. पण त्यांचे रिफ्लेक्सेस म्हणजेच प्रतिसाद देण्याचा वेग मोठ्या माणसांपेक्षा कमी असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते पटकन रिऍक्ट होऊ शकत नाहीत. परिणामी होणारे अपघात आणि धोका टाळता येत नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लहान मुलांची उंची आणि हातांची लांबी सुद्धा लहान असल्यामुळे ते फटाक्यांच्या जास्त जवळ सहज येऊ शकतात, ज्यामुळे गंभीर दुखापत होण्याचा धोका वाढतो.

लहान मुलांच्या बंदुकीतून उडणाऱ्या ठिणग्या, गरम फुलबाजी, आवाजाच्या फटाक्यांतून उडणारी धूळ आणि दारू यामुळे प्रामुख्याने मुलांना जखमा होऊ शकतात.

गॅसच्या आचेपेक्षा जास्त तापमान

लहान मुलांसाठी कमी धोकादायक आणि सहज हाताळता येते म्हणून आपण फुलबाजी देतो. सध्या एका फुलबाजीचे देखील तापमान १०००°C पेक्षा जास्त असू शकते, जे स्वयंपाकघरातील गॅसच्या आचेच्या तुलनेत जास्त असते. याबद्दल बिझनेस स्टँडर्डला माहिती देताना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलचे पेडियाट्रिक्स आणि न्योनाटोलॉजी विभागाचे हेड डॉ. नीरज के. दीपक म्हणाले, १२ वर्षांखालील मुलांना कोणत्याही फटक्यांचा वापर करू दिला नाही पाहिजे. आणि १२ वर्षांच्या वरील मुलांना देखील मोठ्या प्रौढांच्या देखरेखीखालीच फटाके हाताळू द्यावे.

पालकांसाठी टिप्स

- सध्या बऱ्यापैकी लोक बैठी घरांऐवजी, बिल्डिंग अपार्टमेंट मध्ये छोट्या घरात राहतात. त्यामुळे फटाके फोडण्यासाठी मोकळी जागा निवडा, जिथे सुकलेली पानं, गाड्या किंवा कोणतेही इंधन पदार्थ नसतील.

- फक्त ISI मार्क केलेले फटाके खरेदी करा.

- मुलांना कॉटनचे कपडे घाला. आणि सिंथेटिक कपडे घालणं टाळा.

- पाण्याची बादली, वाळू आणि प्रथमोपचार पेटी(First-Aid Kit) जवळ ठेवा. \

- फटाके लांबून लावा. खराब झालेले किंवा पेटत नसलेले फटाके पुन्हा लावण्याचा प्रयत्न करू नका.

- दिवाळीनंतर न वापरलेले फटाके पाण्यात भिजवून टाका.

Diwali Kids Outfits: दिवाळीत लहान मुलांसाठी 'असे' खरेदी करा पारंपारिक आउटफिट अपघात झालाच तर काय कराल? जखमांसाठी:

- जखम तात्काळ धावत्या पाण्याखाली १०–१५ मिनिटे धुवा.

- टूथपेस्ट, हळद किंवा तूप पदार्थ चुकूनही लावू नका.

- स्वच्छ कपड्याने जखम झाकून ठेवा.

- मोठ्या किंवा चेहर्यावर झालेल्या जखमांसाठी तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या.

डोळ्यांसाठी:

-डोळ्याला जखम झाली असेल तर डोळे चोळू नका किंवा धुऊ नका.

- स्वत: डोळ्यात गेलेला कण बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका.

- स्वच्छ कपड्याने हलके झाकून त्वरित आय हॉस्पिटलमध्ये जा.

धूर आणि आवाजाही होतो परिणाम

फटाके जळताना तयार होणार धूर आणि आवाज मुलांच्या श्वसनावर, कानावर आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. त्यामुळे ज्या मुलांना श्वसनाचा त्रास आहे त्यांनी N95 मास्क घालणे किंवा फटाके लावताना जास्त काळ धूरात राहणे टाळावे.

सुरक्षित राहण्यासाठी उपाय

- संध्याकाळी लवकर फटाके वाजवायला सुरुवात करा.

- आवाजापासून सुरक्षेसाठी लहान मुलांसाठी इअरमफ्स किंवा कॉटन प्लग वापरू शकतात.

- घरातील एक खोल जी शांत असले तिथे बाळ, वयस्कर माणसं आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवा.

- तसेच दिवाळीतील अपघात, होणारे त्रास टाळण्यासाठी इको - फ्रेंडली दिलेली साजरी करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.