आळेफाटा, ता. १६ ः आळेफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १५) झालेल्या गाईंच्या बाजारात २८० गाईंची विक्री होऊन ५६ लाख रूपयांची उलाढाल झाली. याबाबतची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रितम काळे, सचिव रूपेश कवडे व आळेफाटा कार्यालय प्रमुख दिपक म्हस्करे यांनी दिली. येथील बाजारात आंबेगाव, शिरूर, पुणे, नाशिक, संगमनेर, अहिल्यानगर, ठाणे येथून संकरीत दुधाळ जातीच्या गाई विक्रीसाठी येत असतात. या आठवडयात बाजारात २८७ संकरीत गाया विक्रीसाठी होत्या. यामध्ये ५ हजारांपासून ते ७० हजार रुपयांपर्यंत गाई विकल्या गेल्या. या आठवड्यात गाईंच्या किमती उतरलेल्या असूनही मोठ्या संख्येने गाई विक्रीसाठी आणल्या गेल्या होत्या, अशी माहिती ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, रोहिदास निमसे, सुमित वर्पे, दिलीप शरमाळे, याकुब सोदागर, चॉंद शेख, उस्मान शेख, हबीब शेख, हबीबुल सौदागर या व्यापाऱ्यांनी दिली.