Gondia News: रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह
esakal October 17, 2025 09:45 AM

नवेगावबांध ( जि. गोंदिया) : येथील सानगडी मार्गावरील कपील भवनसमोर रस्त्याच्या कडेला बुधवारी (ता. १५) व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. ही वार्ता गावात पसरली. लोकांनी घटनास्थळी गर्दी केली.

मृताची ओळख पटली असून, तो डोंगरगाव येथील गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला ललित लक्ष्मण येडाम आहे.

जनावरे चराई करणाऱ्या एका महिलेला सायंकाळी चारच्या सुमारास सानगडी मार्गावर कपीलभवनसमोर रस्त्याच्या कडेला झाडी-झुडपात एक मृतदेह दिसला. तिने ही  माहिती शेजारील शेंडे यांना दिली.

Nagpur News: सावरमेंढा शिवारात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

त्यांनी शेजारी राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते राजकुमार उंदीरवाडे यांना ही माहिती लागलीच दिली.त्यांनी पोलिसांना भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.