आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून सप्टेंबर २०२५ महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार जाहीर करण्यात आले.
भारतीय खेळाडू अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांनी या पुरस्कारावर मोहोर उमटवली.
अभिषेकने आशिया कप २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, तर स्मृतीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चमकदार प्रदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) गुरुवारी (१६ ऑक्टोबर) सप्टेंबर २०२५ महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातील या पुरस्कारावर भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व राहिले आहे.
भारताचा अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांनी या पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. या दोघांनीही सप्टेंबर महिन्यात अफलातून कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते.
ODI Rankings मध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंचं राज्य! राशिद खान-ओमरझाई अव्वल; तर कसोटीत जैस्वालची भरारीसप्टेंबर २०२५ महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पुरस्कारासाठी अभिषेक शर्मासह भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि झिम्बाब्वेच्या ब्रायन बेटेन यांनाही नामांकन मिळाले होते.
कुलदीप आणि ब्रायन यांचीही कामगिरी सप्टेंबर महिन्यात चांगली राहिली होती. पण या तिघांमधून अभिषक शर्माने बाजी मारली आहे. त्यामुळे आशिया कप २०२५ मधील मालिकावीर ठरलेल्या अभिषेक शर्माचा सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आयसीसीकडून सन्मान करण्यात आला आहे.
सप्टेंबरमध्ये भारतीय संघ आशिया कप २०२५ स्पर्धा खेळण्यास व्यस्त होता. या स्पर्धेत अभिषेकने ७ सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांच्या सहाय्याने जवळपास २०० च्या स्ट्राईक रेटने ३१४ धावा केल्या होत्या.
याशिवाय त्याने सप्टेंबरमध्येच आयसीसी टी२० क्रमवारीत ९३१ रेटिंग पाँइंट्स मिळवले, जे आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने मिळवलेले सर्वाधिक रेटिंग पाँइंट्स आहेत. त्यामुळे टी२० क्रमवारीच्या इतिहासात अभिषेकने नवा इतिहास घडवला.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिषेक शर्मा म्हणाला, 'आयसीसीचा हा पुरस्कार जिंकणे शानदार आहे आणि मला आनंद आहे की हा पुरस्कार मला काही महत्त्वाच्या सामन्यामध्ये मी संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिल्याबद्दल मिळाला आहे. मला अशा संघाचा भाग होण्याचा अभिमान आहे, जो संघ कठीण परिस्थितीतही विजय खेचून आणतो.'
'आमची टी२० मधील सध्याची आकडेवारी संघातील वातावरण आणि सकारात्मक मानसिकता दाखवून देते. मी संघव्यवस्थापनाचे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि मला पाठिंबा दिलेल्या सर्व संघसहकाऱ्यांचे आभार मानतो. तसेच मला या पुरस्काराचा विजेता ठरवणाऱ्या पॅनलचेही आभार.'
INDW vs AUSW: स्मृती मानधना - प्रतिका रावल ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'हा' पराक्रम करणारी जगातील पहिली जोडी; ५२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला स्मृती मानधनाही ठरली पुरस्काराची विजेतीसप्टेंबर २०२५ महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी स्मृती मानधनासह पाकिस्तानची सिद्रा अमिन आणि दक्षिण आफ्रिकेच्या ताझमिन ब्रिट्स यांना नामांकन होते, पण यामध्ये स्मृती मानधानाने बाजी मारली.
स्मृतीने खरंतर या संपूर्ण वर्षातच चांगली कामगिरी केली आहे. ती सप्टेंबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळली. याशिवाय ती महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळली. या चार सामन्यांमध्ये स्मृतीने ७७ च्या सरासरीने १३५.६८ च्या स्ट्राईक रेटने ३०८ धावा केल्या. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनुक्रमे ५८, ११७ आणि १२५ धावांची खेळी केली होती.
हा पुरस्कार जिंकण्याबद्दल आनंद व्यक्त करताना म्हणाली, 'मला सप्टेंबर २०२५ महिन्यातील आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिमान वाटत आहे. कौतुक नेहमीच मला खेळाडू म्हणून आणखी विकास करण्यास प्रोत्साहन देते. याशिवाय असा सन्मान एक संघ म्हणून मिळालेल्या पाठिंब्याला , विश्वासाला आणि प्रयत्नांनाही दर्शवतात.'
'माझं ध्येय नेहमीच माझे सर्वोत्तम योगदान देऊन संघाला विजय मिळवून देण्याचे राहिले आहे. मी पुढे येणाऱ्या संधीचा वापर करून आणखी अविस्मरणीय विजय भारतीय संघाला मिळवून येण्यासाठी उत्सुक आहे. '