कणकवली उड्डाणपुलाखाली सजला दीपावलीसाठी बाजार
esakal October 17, 2025 01:45 PM

98899
कणकवली उड्डाणपुलाखाली
सजला दीपावलीसाठी बाजार

समीर नलावडे मित्रमंडळातर्फे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ : कणकवली शहर भाजप आणि समीर नलावडे मित्रमंडळातर्फे शहरातील पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलाखालील दिवाळी बाजाराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक सेवा संपाचे जिल्हाध्यक्ष राजस रेगे यांनी केले. हा दिवाळी बाजार १९ ऑक्टोबरपर्यंत असेल.
दिवाळी बाजार उद्घाटन कार्यक्रमावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, बंडू हर्णे, अर्जुन राणे, किशोर राणे, अण्णा कोदे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, चारू साटम, संजय कामतेकर, विराज भोसले, प्रद्युम मुंज, निधी निखार्गे, सुनील नाडकर्णी, लवू पिळणकर, परेश परब, मनोहर पालयेकर, राजन भोसले, सखाराम सकपाळ, भालचंद्र मराठे, संजीवनी पवार, भारती पाटील, स्मिता कामत, प्रिया सरूडकर, क्रांती लाड, संजीवनी आदी उपस्थित होते.
या दिवाळी बाजारामध्ये ग्राहकांना विविध वस्तू व पदार्थांच्या खरेदीसाठी एकूण ४० स्टॉल्स लावले आहेत. घरगुती बनविलेले चविष्ट फराळाचे साहित्य, आकर्षक आकाश कंदील, सुबक मातीच्या पणत्या यासह दिवाळीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू या बाजारात उपलब्ध आहेत. कणकवली शहर आणि परिसरातील बचतगट, स्थानिक कलावंत, कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी गेली आठ वर्षे हा दिवाळी बाजार आम्ही भरवत आहोत, अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.