वणी: राज्य शासनाने शेतकर्!यांसाठी अतीवृष्टीचे जम्बो पॅकेज जाहीर केले. त्यासाठी वणी विभागातील सर्व शेतकरी मदतीसाठी पात्र ठरणार आहेत. दिवाळीपूर्वीच शेतकर्!यांच्या बँक खात्यात तीन हेक्टर मर्यादेपर्यंत हेक्टरी १८ हजार पाचशे रुपये मिळणार, असे येथील माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकर्!यांना आश्वासन दिले. त्यामुळे वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतकर्!यांच्या नजरा पॅकेजच्या मदतीकडे लागल्या आहेत.
शासनाकडून त्वरित नुकसानभरपाईची मदत मिळाली, तरच घरी दिवाळी साजरी होणार, अशीच स्थिती तालुक्यातील बहुतांश शेतकर्!यांची सध्या आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्!यांचे प्रचंड नुकसान झाले.
Premium| Maharashtra Crop Damage: कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळाल्याशिवाय शेतकरी रब्बीची पेरणी कशी करतील?दिवाळी जवळ आली तरी थोडाथोडकाही कापूस हातात आला नाही. सोयाबीनचे तर हाती येण्याच्या वाटेवर असलेले पीक पावसाने झोडपून काढले. सोयाबीनचा दाना भरला नाही. भरला तो शेंगातच वापून गेला. आता जे उरले ते पीक काढणेही शेतकर्!यांना परवडणारे नाही. उत्पन्नापेक्षा पीक काढण्यासाठी लागणारा खर्च अधिक होणार हे साक्षात दिसत आहे.
काही शेतकरी निदान दिवाळी तरी साजरी करता येईल म्हणून पीक काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, निघालेले सोयाबीन काळपट असल्याने बाजारात त्याला तीन हजार ते साडेतीन हजार भाव मिळत आहे. हमी भावापेक्षाही निम्मे भाव मिळल्याने शेतकर्!यांच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसत आहे.
Premium| NDRF criteria change: शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सरकार केंद्राकडे ‘एनडीआरएफ’ निकष बदलाची मागणी करणार आहे. पूरग्रस्तांना तत्काळ मदत आणि पुनर्वसनावरही भरशेतकर्!यांना एकरी २० ते ३० हजारांचे नुकसान सोसावे लागणार आहे. सरकारने शेतकर्!यांसाठी कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी १८ हजार पाचशे रूपयांची मदत जाहीर केली तर बागायती पिकासाठी २७ हजार पाचशे तसेच पिकविमा काढणार्!या शेतकर्!यांसाठी विम्याची अतिरिक्त रक्कम देण्याचेही जाहीर केले.
परंतु, ही मदत तत्काळ मिळाली असती तर निव्वळ शेतीवर अवलंबून असणार्!या शेतकर्!यांची दिवाळी साजरी झाली असती, अशी त्यांची अपेक्षा आहे. यासाठी शेतकर्!यांनी काम धंदा बाजूला सारून कृषी विभागाकडे शेतीचे कागदपत्र व बँकेच्या पासबुकाची सत्यप्रत आशेने सादर केली आहे. आजतरी पैसे जमा झाले काय, याची दररोज चौकशी केली जात आहे. परंतु, शेतकर्!यांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्यामुळे दिवाळीसारखा सण कसा साजरा करावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.
आपणच बळी का ठरलो?आता दिवाळीला फक्त पाच दिवस उरले असल्याने शेतकरी अधीर झालेला दिसून येत आहे. त्यांची मुलेबाळही घरी फराळ, फटाके, नवे कपडे केंव्हा येणार, याची आतुरतेने वाट पहात आहेत. चाकरमान्यांची दिवाळीची तयारी पाहून शेतकर्!यांना आपणच नैसर्गिक आपत्तीचे बळी का ठरलो, हा प्रश्न सतावत आहे.