Dancers Incident Kolhapur : कोल्हापुरात सहा नृत्यांगनांनी हाताच्या नसा घेतल्या कापून; धक्कादायक घटना समोर
esakal October 18, 2025 03:45 AM

Kolhapur Crime News : कोल्हापुरातील महिला सुधारगृहात सहा नृत्यांगनांनी एकत्रितपणे आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या महिलांनी हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, तात्काळ प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून सर्वांना रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्व महिलांवर जिल्हा सरकारी रुग्णालयात (सीपीआर) उपचार सुरू आहेत.

ही धक्कादायक घटना आज (ता.१७) शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सुधारगृहातील कर्मचाऱ्यांना ही घटना समजताच तत्काळ सीपीआर रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्वांवर सीपीआर देऊन उपचार सुरू केले आहेत. या सहाही महिला दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी कारवाई दरम्यान त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार त्यांना महिला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. या सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Kolhapur Police Action : ...आता कोल्हापूर पोलिसांची सटकली, मारहाण करणाऱ्या गुंडांना कान धरून रस्त्यावर फिरवले

मागच्या दोन दिवसांपूर्वी नृत्यांगनांवरून पोलिसांत तक्रार

नंदगाव (ता. करवीर) येथे एका खासगी कार्यक्रमात नृत्यांगना नाचवल्यावरून आयोजक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये काल मध्यरात्री वादावादी झाली. याबाबत मिळालेली माहिती अशी : नंदगाव येथे काही तरुणांनी एका फार्म हाऊसवर पार्टी आयोजित केली होती. त्यासाठी नृत्यांगनांना बोलाविले होते. त्यांनी नृत्य सुरू केले. हा सारा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिसला.

ही माहिती गावात पसरली. त्यानंतर काही तरुण तेथे गेले व त्यांनी गावात नृत्यांगना नाचविण्यास कोणाची परवानगी घेतली, असा सवाल संबंधितांना विचारला. यातून मोठी वादावादी झाली. त्यानंतर घटनास्थळी करवीर पोलिस आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.