Khandala Accident:'खंबाटकी घाटातील अपघातात चौघे जखमी'; ब्रेक निकामी झाल्याने एका ट्रकची एसटीसह दोन वाहनांना धडक
esakal October 18, 2025 03:45 AM

खंडाळा : सातारा- पुणे महामार्गावर खंबाटकी घाटाच्या पायथ्याला जुन्या टोल नाक्याजवळ ब्रेक निकामी झालेल्या ट्रक एसटी बससह ट्रक अशा दोन वाहनांना धडक देत उलटला. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, चौघे जण जखमी झाले आहेत. सुदैवाने एसटी बसमधील २२ प्रवासी बचावले. घटनेची नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात झाली आहे.

Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवा

प्रकाशचंद्र बद्रीलाल मीना (वय ३५, रा. उदयपूर, राजस्थान), विनोद रतन जाट (वय २२, विजयनगर, जि. बियावर, राजस्थान), लकीसिंग केसरसिंग रावत (रा. पंचकोट, जि. अजमेर, राजस्थान) व प्रकाश आनंदराव वाडकर (वय २९, रा. बावधन, ता. वाई) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल रात्री साडेदहा वाजण्याचा सुमारास खंबाटकी घाट उतरल्यानंतर भरधाव येणाऱ्या ट्रकचा ब्रेक निकामी झाला. यावेळी या ट्रकने आटपाडी- मुंबई एसटी बसला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे बस झाडाला व कठड्याला धडकली. सुदैवाने बस उलटली नसल्याने सर्व प्रवासी बचावले, तर पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली. यात दोन्ही ट्रक उलटले.

MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!

दरम्यान, चालक ट्रकमध्येच अडकले. त्यांना कटर व क्रेनच्या साह्याने खंडाळा रेस्क्यू टीम व खंडाळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढले. घटनेची फिर्याद चालक विकास दत्तात्रय गिरी (वय २५, रा. रामनगर, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.