Javali politics:'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला सदाशिव सपकाळ'; निवडणुकीच्या तोंडावर विविध प्रश्नांवर चर्चा; जावळी तालुक्यात खळबळ
esakal October 18, 2025 03:45 AM

कास : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते आपल्या दरे गावी मुक्कामी असताना माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांनी भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याने या भेटीची जावळी तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू होती.

Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवा

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पक्षस्तरावर निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढवल्या जाणार की काही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत अजूनही चित्र स्पष्ट झालेले नाही.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात काल मेळावा घेतला, तसेच महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदी पक्षांमधील स्थानिक नेत्यांशी भेटी व चर्चा सुरू केली आहे.

MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!

या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांच्यासमवेत भेट घेतली. त्यानंतर श्री. सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. श्री. सपकाळ यांच्या मुलाचे नोव्हेंबर महिन्यात लग्न असून, त्याची निमंत्रण पत्रिका देण्याच्या निमित्ताने त्यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.