Obscene acts involving minors Ratnagiri : खेड तालुक्यातील भगवान कोकरे महाराज याच्यावर आणखी एका अल्पवयीन मुलीने लैंगिक शोषण केल्याबाबत तक्रार केली असून, खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोकरे महाराजासह त्याचे सहकारी प्रीतेश कदम, तसेच पीडित मुलीची आत्यावरही गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ ऑक्टोबर २०२४ ते १८ जून २०२५ या कालावधीत खेड तालुक्यातील एका पीडितेने दिलेल्या जबाबानुसार कोकरे महाराजाकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेत शिक्षक प्रीतेश कदम आणि तिची आत्या यांचाही सहभाग असल्याचे तिने सांगितले आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी या तिघांविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Kolhapur Police Action : ...आता कोल्हापूर पोलिसांची सटकली, मारहाण करणाऱ्या गुंडांना कान धरून रस्त्यावर फिरवलेकोकरे महाराज याच्याविरोधात झालेल्या दुसऱ्या तक्रारीमुळे हे प्रकरण अधिक गंभीर आणि संवेदनशील झाले आहे. काही दिवसांपूर्वीच पहिल्या पीडितेच्या तक्रारीनंतर कोकरे महाराज आणि शिक्षक कदम यांना न्यायालयात हजर केले होते. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आता नव्या प्रकरणामुळे त्यांच्यावर कडक कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. स्थानिकांकडून आणि सामाजिक संघटनांकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची, तसेच गृहमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.