दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला सोन्याने पुन्हा महागाईचा बॉम्ब टाकला. तर चांदीचा तोरा उतरला. गेल्या काही दिवसात दोन्ही धातुनी मोठी मुलूखगिरी केली. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. जळगावच्या सराफा बाजारामध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या विक्रमी वाढ झाली आहे तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. पण या दोन्ही धातुनी यंदा विक्रमी पल्ला गाठला आहे. गेल्या वर्षी एक लाखांच्या आत असलेल्या सोन्याने सव्वा लाखांचा टप्पा ओलांडला तर चांदी तर थेट दोन लाखांच्या घरात खेळत आहे.
सोने 3,600 रुपयांनी महागले
सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3 हजार 600 रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 35 हजार 239 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 80 हजार रुपये एवढे आहे. जळगावच्या सराफ बाजारात च्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दराने विना जीएसटी 1 लाख 31 हजार 300 रुपयांचा टप्पा गाठला आहे.
सोने-चांदीत तुटवडा, किंमती भडकणार?
सोन्याने चांदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढत असल्याने चांदी बरोबर जळगावच्या सराफा बाजारांमध्ये सोन्याचा देखील काही प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याचे सराफ व्यावसायिक यांनी सांगितले. अशाच पद्धतीने दर वाढत राहिल्यास दिवाळीत ऐन मुहूर्तावर सोन्याचा मोठा तुटवडा जाणवेल, अशी शक्यता देखील सराफ व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे.
सोन्याची किंमत काय?
goodreturns.in नुसार, 24 कॅरेट सोन्यात 333 रुपयांची वाढ झाली. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 32 हजार 920 रुपये इतका झाला. तर 22 कॅरेट सोने 305 रुपयांनी वधारले. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 21 हजार 850 रुपये असा आहे. काल किंमतीत कोणताही बदल झाला नसल्याचे दिसते.
चांदी 5 हजारांनी स्वस्त
चांदीने या वर्षी इतिहास रचला. एक किलो चांदीचा भाव 1 लाख 85 हजारांच्या घरात पोहचली आहे. गेल्या दोन दिवसात चांदीत 5 हजारांची घसरण आली. 16 ऑक्टोबर रोजी चांदीत 1 हजारांची तर 17 ऑक्टोबर रोजी चांदीत 4 हजारांची घसरण झाली. एकूण 5 हजारांनी किंमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,90,000 रुपयांहून 1 लाख 85 हजारांपर्यंत खाली आला.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदी घसरले. 24 कॅरेट सोने 1,30,870 रुपये, 23 कॅरेट 1,30,350, 22 कॅरेट सोने 1,19,880 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 98,160 रुपये, 14 कॅरेट सोने 76,560 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,68,083 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.