Dhanteras Rangoli 2025: धनत्रयोदशीच्या सायंकाळी पूजेच्या वेळी घरासमोर ही रांगोळी काढा; मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद
esakal October 18, 2025 06:45 PM

Dhanteras 2025 Rangoli Designs: धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस मानला जातो. या दिवशी आरोग्याचे देवता धन्वंतरी यांची पूजा केली जाते, तसेच समृद्धीचं प्रतीक असलेल्या लक्ष्मी देवीचं स्वागतही केले जाते. यंदा धनत्रयोदशी हे १८ ऑक्टोबर, शनिवार रोजी आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी ७:१६ ते ८:२० दरम्यान आहे.

पूजेच्या अगोदर, घरासमोर रंगीबेरंगी, सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले जाते. रांगोळी ही केवळ सजावट नाही, तर ती सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आणि देवी लक्ष्मीचे स्वागत करणारे एक पारंपरिक माध्यम आहे.

त्यामुळेच, यंदा तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत धनत्रयोदशीसाठी खास रांगोळी डिझाइन्स. या सोप्या डिझाइन्स पाहून तुम्हीही सहज सुंदर रांगोळीकाढू शकता आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवू शकता.

Diwali 2025: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राशीनुसार 'हे' उपाय करा, घरात भरभराट होईल!

Dhanteras Rangoli 2025

सर्वप्रथम रांगोळी काढण्याआधी पेन्सिलने कमळ, कलश, आणि त्याच्या सभोवती गोलाकार आकृती रेखाटून घ्या. यानंतर तुमच्या आवडीनुसार त्यात विविध रंग भरावे. कलश्याच्या वरती पिवळ्या रंगाने नाण्यांची रचना तयार करा. जी समृद्धीच प्रतीक मानली जाते. कलशच्या बाजूला "धनतेरस" असे सुंदर अक्षरात लिहा, ज्यामुळे रांगोळी अधिक उठून दिसेल.

Dhanteras Rangoli 2025

सुरुवातीला गोलाकर आकृती रेखाटून घ्या. त्यात हिरव्या रंगाची रांगोळी भरा. आणि मध्यभागी कलश काढून त्यावर पिवळ्या रंगाने नाण्यांची रचना तयार करा. गोलाकारच्या भोवताली पंढऱ्या आणि जांभळ्या रंगोळीचे टिपक्यानी सजवा.

Diwali Party Ideas: दिवाळी पार्टी प्लॅन करताय? मग या ७ सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!

Dhanteras Rangoli 2025

धनत्रयोदशीच्या दिवशी दारासमोर काढायचा विचार करत असाल, तर पहिल्यांदा एक गोल आकार काढा आणि त्यामध्ये गुलाबी रंग भरा. त्या गोलाच्या मध्यभागी "शुभ धनतेरस"असं लिहा.

Dhanteras Rangoli 2025

सर्वप्रथम, रंगोळीसाठी एक चौकोन आकार तयार करा आणि त्यात डार्क निळा रंग भरावा. त्याच्या मध्यभागी मध्यभागी कलश काढून त्यावर पिवळ्या रंगाने नाणी तयार करा. आणि फुलांच्या पाकळ्या काढा.

Dhanteras Rangoli 2025

धनत्रयोदशीच्या दिवशी रांगोळी काढून घराची शोभा वाढवायची असेल तर सर्वप्रथम, एक चौकोन आकृती काढा त्यात डार्क निळा रंग भरा आणि एक कलश काढा आणि नाण्यांनी भरलेला दुसरा कलश रेखाटा आणि त्यानंतर, त्याच रांगोळीत पुस्तकाचं चित्र काढा आणि त्यात "शुभ लाभ" असं लिहा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.