Free Gold : 24 कॅरेट सोने मोफत मिळवा, ऑफर लगेच संपणार, कुठे आणि कसं खरेदी करणार?
Tv9 Marathi October 19, 2025 01:45 AM

Digital Gold Purchase Offers : दिवाळी हा सणांचा राजा आहे. या पाच दिवसात सोने आणि चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. या काळात मौल्यवान धातुची खरेदी शुभ मानण्यात येते. सोने आणि चांदीची खरेदी परंपरा पाहता, यंदा अनेक प्लॅटफॉर्म आणि ॲप्सनी अनेक धमाकेदार ऑफर्सची लयलूट केली आहे. ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक ऑफर्स दिल्या आहेत. तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि ॲप्स सुद्धा मागे नाहीत.

जिओचा धमाका

रिलायन्स समूहाची कंपनी जिओ फायनान्सच्या मायजिओ या ॲपवर 2000 रुपये अथवा त्यापेक्षा अधिक डिजिटल गोल्ड खरेदी केल्यास 2 टक्के सोने मोफत मिळणार आहे. सोने खरेदी केल्यावर या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 72 तासात ग्राहकांच्या गोल्ड वॉलेटमध्ये हे सोने जमा होईल. ही ऑफर 18 ते 23 ऑक्टोबर दरम्यान असेल.

मोठे बक्षिस मिळण्याची संधी

20 हजार अथवा त्यापेक्षा अधिक सोने खरेदी केल्यावर जिओ मेगा प्राईज ड्रॉमध्ये खरेदीदाराची एंट्री होईल. ग्राहकाला येथे एकूण 10 लाखांपर्यंतचे बक्षिस जिंकण्याची संधी आहे. यामध्ये स्मार्टफोन, टेलिव्हिजन सोन्याची नाणी, मिक्सर ग्राईंडर आणि गिफ्ट व्हाऊचर यांचा समावेश आहे.

तर क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टवर 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे शिक्के आणि एक किलोग्रॅम चांदीची विट आणि शिक्के घरपोच देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये कल्याण ज्वेलर्स, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स, मुथूट एक्झिम, एमएमटीसी-पॅम्प, मिया बाय तनिष्क, गुल्लक आणि वोयला सोबत करार करण्यात आला आहे.

कमीत कमी इतकी करा सोने खरेदी

ग्राहक 0.1 ग्रॅम ते 10 ग्रॅम वजनापर्यंत सोने ऑर्डर करु शकतात. अर्ली बर्ड ऑफर अंतर्गत धनत्रयोदशीला एक ग्रॅम अथवा त्यापेक्षा अधिक वजनाच्या सोन्याचं नाणं खरेदी करणाऱ्या पहिल्या 10,000 ग्राहकांना 100 रुपयांची सवलत मिळेल. ही ऑफर आजपासून सुरु झाली आहे.

येथे सुद्धा स्वस्तात सोने खरेदीची संधी

डिजिटल सोने खरेदीत मेकिंग चार्ज नसतो. त्यामुळे ही खरेदी दागदागिने खरेदीपेक्षा स्वस्तात पडते. डिजिटल गोल्ड हे विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. Paytm, PhonePe, Google Pay वा Tanishq येथून ते खरेदी करता येईल. हे सोने तुम्हाला कधीही विक्री करता येते. विशेष म्हणजे हे सोने चोरी होण्याची भीती नसते. याशिवाय ते गोल्ड ETF मध्ये सुद्धा बदलता येते. या प्लॅटफॉर्मवर गेल्यवर तुम्हाला सोने-चांदीवर खरेदीसंबंधीची ऑफर समजू शकते. त्याआधारे तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.