बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. पहिल्या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात नाणेफेकीच कौल हा वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला होता आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकात 207 धावा केल्या आणि विजयासाठी 208 धावांचं आव्हान दिलं. खरं तर हे आव्हान सोपं होतं. पण वेस्ट इंडिजला धावांचा पाठलाग करणं काही जमलं नाही. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 39 षटकं खेळत 133 धावांवर बाद झाला. बांगलादेशने पहिल्या सामन्यात 74 धावांनी विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. या सामन्यातील विजयाची शिल्पकार ठरला तो रिशाद होसेन.. त्याने भेदक गोलंदाजी करत 9 षटकात 35 धावा देत निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. त्याने 6 विकेट घेतल्या.
वेस्ट इंडिजकड़ून ब्रँडन किंग आणि एलिक एथान्झे यांनी पहिल्या विकेटसठी 51 धावांची भागीदारी केली होती. ब्रँडन किंगने 60 चेंडूत 44 धावा केल्या. तर एलिक एथान्झेने 27 धावांची खेळी केली. त्यामुळे हा सामना वेस्ट इंडिजच्या हातात होता. मात्र त्यानंतर धडाधड विकेट पडत गेल्या. वेस्ट इंडिजचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. सहा खेळाडू फक्त एकेरी धावांवर तंबूत गेले. एकाला तर खातंही खोलता आलं नाही. तर कर्णधार शाई होप 15 आणि जस्टीन ग्रीव्ह्सने 12 दावा केल्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने या पराभवानंतर स्पष्ट केलं की, ‘आपल्याला फक्त पुढील सामन्यासाठी शक्य तितक्या लवकर मूल्यांकन करावे लागेल आणि जुळवून घ्यावे लागेल आणि बांगलादेशला हरवून मालिका बरोबरीत आणण्याचे मार्ग शोधावे लागतील. हाच मार्ग आहे.’
पराभवानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप म्हणाला की, ‘कठीण सामना होता. आम्हाला आव्हाने समजली, विशेषतः या मैदानावर फलंदाज म्हणून. पण हो, आम्हाला शक्य तितक्या लवकर या सामन्याला मागे टाकावे लागेल. आमच्याकडे दोन दिवस आहेत, या सामन्यातून सर्व धडे घ्यायचे आहेत. आमच्या फिरकी गोलंदाजांचे अधिक सातत्यपूर्ण असण्याचे महत्त्व समजून घ्यायचे आहे. त्यांनी त्या मधल्या काळात खरोखर चांगली गोलंदाजी केली आणि काही काळासाठी धावांचा प्रवाह थांबवला. पण हो, फक्त या सामन्यातून शिकून पुढच्या सामन्यासाठी मजबूत परत यायचे आहे.ट